दहावी बारावीचे विद्यार्थी आता होणार नाहीत "नापास" किंवा "अनुत्तीर्ण" : ‘एटीकेटी’ ऐवजी ‘कौशल्य विकासास पात्र’ असा शेरा दिला जाणार : - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

दहावी बारावीचे विद्यार्थी आता होणार नाहीत "नापास" किंवा "अनुत्तीर्ण" : ‘एटीकेटी’ ऐवजी ‘कौशल्य विकासास पात्र’ असा शेरा दिला जाणार :

Share This
“राज्य सरकारने अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना रोजगारक्षम करण्यासाठी ‘कौशल्य सेतू कार्यक्रम’ योजना राबवण्यास मान्यता दिली आहे. परिणामी, दहावी आणि बारावीच्या गुणपत्रिकेवर आता ‘नापास’ किंवा ‘अनुत्तीर्ण’ शेरा हद्दपार होणार आहे. त्याऐवजी नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या मार्कशीटवर ‘कौशल्य विकासास पात्र’ असा शेरा दिला जाणार आहे.”
खबरकट्टा / महाराष्ट्र : शासन निर्णय -


महाराष्ट्रा शासनाचा हा निर्णय यापूर्वी केवळ दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मर्यादित होता. मात्र नुकतंच महाराष्ट्र शासनाने बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीही याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे. याबाबतचा शासन निर्णय कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने जारी केला असून तसा प्रस्ताव राज्य शिक्षण मंडाळाकडे पाठवण्यात आला आहे.


दहावी आणि बारावीचं शैक्षणिक वर्ष विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचं व जीवनाला वळण देणारा एक मोठा टप्पा असतो. या टप्प्यावर अनुत्तीर्ण झाल्यास समोरच्या भविष्याच्या वाटचालीत अडथळे निर्माण होतात. अशा तरुणांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि स्वत:च्या पायावर उभे राहण्याची क्षमता निर्माण व्हावी यासाठी दहावी आणि बारावी उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांकरिता कौशल्य सेतू कार्यक्रम योजना राबवण्यात येणार आहे.


यापूर्वी शिक्षण विभागाने 27 सप्टेंबर 2018 रोजी शासन निर्णय जारी करुन दहावी परीक्षेत तीन किंवा त्यापेक्षा अधिक विषयांमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ‘कौशल्य विकासास पात्र’ असा शेरा देण्याचं नमूद केलं आहे. यानंतर दहावीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘एटीकेटी’ असा शेरा येत होता.