विदर्भ महाविद्यालय येथे राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस संपन्न - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विदर्भ महाविद्यालय येथे राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस संपन्न

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर  जिवती -  संतोष इंद्राळे 


दिनांक २ डिसेंबर रोजी राष्ट्रीय प्रदुषण नियंत्रण दिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

भोपाळ येथे २ डिसेंबर १९८४ रोजी दुषित वायू गळतीने उद्भवलेल्या संकटाने जी हानी आली ती कधीही न भरून निघणारी आहे. तसेच पर्यावरणामुळे उद्भवणाऱ्या समस्या या विषयावर वरिल वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.प्रदूषणामुळे होणारे मानवी त्यांच्या जिवन कौशल्यावर होणारे मानवी आपत्ती कसे उमटले पर्यावरणाच्या  र्‍हासामुळे होणारी नैसर्गिक व मानवी आपत्ती किती भयंकर असते त्याचे दुष्परिणाम प्रदुषणाला नियंत्रणात आणणे आज काळाची गरज आहे.पर्यावरणाचे संतुलन राखणे " झाडे लावा, झाडे जगवा",  स्वच्छता अशा अनेक विषयांच्या माध्यमातून प्रदूषणावर  व नियंत्रणावर मत मांडले यात कु .मयमुन शेख प्रथम,अजय बच्चेवार द्वितीय, जयश्री गायकवाड तृतीय पुरस्काराचे मानकरी ठरले.


सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.एच.एस.शाक्य ,प्रमुख मार्गदर्शक प्रा.लांडगे तर प्रमुख पाहुणे म्हणूनप्रा.मस्कले,प्रा.वासाडे,प्रा.तेलंग,प्रा.मुंडे.प्रा. पानघाटे,प्रा.साबडे ,प्रा.मंगाम,प्रा.देशमुख उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन प्रा.राऊत तर आभार प्रदर्शन कु.रूपाली गोतावळे नी मानले.सदर कार्यक्रम यशस्वीकरिता महाविद्यालयीन शिक्षकत्तेर कर्मचार्‍यांचे मोलाचे सहकार्य लाभले.