धावत्या बस मध्ये महिलेने दिला बाळास जन्म : चालकाच्या समयसूचकतेने सुरक्षित प्रसूती - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

धावत्या बस मध्ये महिलेने दिला बाळास जन्म : चालकाच्या समयसूचकतेने सुरक्षित प्रसूती

Share This
खबरकट्टा / गडचिरोली : वडसा-


जन्म आणि मृत्यू अनिवार्य घटना असल्या तरी या कधी, केव्हा, कुठे घडतील हे विधिलिखितच म्हणता येईल. अशीच एक घटना वडसा ते आरमोरी बस प्रवासादरम्यान प्रवाश्यांनी अनुभवली. सकाळच्या थंडीत वडस्याहुन आरमोरी साठी बसचा प्रवास सुरु झाला, इतक्यात बस मधील प्रवाशी एका गरोदर महिलेला प्रसववेदना सुरु झाल्या. 

इतर प्रवाश्यांच्या लक्षात येताच चालकाने काय प्रकार बघण्यासाठी बस थांबविली.तर गरोदर महिलेला अचानक प्रसूती कळा सुरु झाल्याने इतर महिला प्रवाश्यांच्या मदतीने सदर महिलेने बाळाला जन्म दिला. ही गरोदर महिला भाग्यश्री महेंद्र राऊत (21) असून  भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील मांढळ गावातील रहिवासी आहे. 

भाग्यश्री महेंद्र राऊत या पतीसोबत आज सकाळी साकोली -चंद्रपूर येथे नेहमीच्या चेक अप करिता बस क्रमांक एम एच -40 एन9567 ने प्रवास करीत होत्या. तेव्हा देसाईगंज जवळ अचानक त्यांना वेदना सुरु झाली व आसपास कोणताही दवखाना नसल्याने बस चालक गेडाम व वाहक भारवे यांनी कोंढाळा जवळ बस थंबविली व बसमधील इतर महिला प्रवाश्यांनी मदत करत सुखरूप प्रसूती झाली परंतु बाळाचे वजन फारच कमी असल्याने, नवजात जीवास धोका बघता तुरंत चालकाने आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात बस पोहोचविली. 

त्यानंतर तिथे सुद्धा गेल्यावर बाळाचे वजन फक्त 1200ग्राम भरल्याने, गंभीर परिस्थिती बघता माता व नवजात बाळाला तुरंत जिल्हा महिला रुग्णालयात पाठविण्यात आले. सध्या बाळाची हालत नाजूक असून एसटी महामंडळाच्या चालक-वाहकांच्या समयसूचकतेने व प्रवाश्यांच्या मदतीने माताव बाळाचे प्राण वाचले.