उपसरपंचासह बारा सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार : नियमबाह्य बांधकाम परवानगी घेऊन अतिक्रमण करणे भोवणार - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

उपसरपंचासह बारा सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार : नियमबाह्य बांधकाम परवानगी घेऊन अतिक्रमण करणे भोवणार

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना : नांदा ग्रामपंचायतीत अनागोंदी कारभार

नांदा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचाने नियमबाह्य इमारत बांधकाम परवानगी मिळवत शेतमालकाने सोडलेल्या नऊ मीटर सर्विस रोडवर अतिक्रमण करुन वाणिज्य वापराचे हेतुने व्यावसायिक गाळे बांधल्याने या प्रकरणात नियमबाह्य बांधकाम परवानगी देणार्‍या सरपंच , उपसरपंचासह बारा सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याकरीता विभागीय आयुक्त नागपुर यांनी सुनावणी घेऊन कारवाई करण्याची परवानगी मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हापरीषद चंद्रपूर यांना दिली असल्याने अतिक्रमण करुन वाणिज्य बांधकाम करणे उपसरपंचाचे अंगलट आले आहे.


नांदा ग्रामपंचायतीचे उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले यांनी मार्च २०१७ मध्ये ग्रामपंचायतीकडून इमारत बांधकाम परवाना घेऊन बांधकाम केले ग्रामपंचायत हद्दीतील गावठाण क्षेत्राबाहेर बांधकाम करावयाचे असल्यास पंचायतीला इमारत बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार नाही शासन निर्णयानुसार नगररचनाकार यांचेकडून बांधकाम परवागनी घेणे बंधनकारक आहे.

पुरुषोत्तम आस्वले यांनी नियमबाह्य परवानगी मिळवून शेतमालकाने सोडलेल्या नऊ मीटर सर्विस रोडवर अतिक्रमण करुन वाणिज्य वापराचे बांधकाम केल्याने याबाबतची तक्रार गटविकास अधिकारी पंचायत समिती कोरपना यांचेकडे करण्यात आली होती तत्कालीन गटविकास अधिकारी डाॅक्टर संदीप घोन्सिकर यांनी तब्बल वर्षभर चौकशी केल्यानंतर अहवाल कारवाई करीता जिल्हा परीषदेकडे पाठविला पोचपावती करीता प्रकरण ७ महीने जिल्हापरीषदेत अडकून राहीले. 

तक्रारकर्त्याच्या सततच्या रेट्याने कारवाई करीता प्रकरण आयुक्तांकडे पाठविण्यात आले अखेर विभागीय आयुक्त नागपुर विभाग नागपुर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांना नांदा ग्रामपंचायतीच्या सरपंच , उपसरपंचासह बारा सदस्यांचे पद व सदस्यत्व रद्द करण्याकरीता मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९(१) अन्वये सुनावणी घेऊन चौकशी अहवाल सादर करण्याची परवागनी दिली असल्याने २४ डिसेंबर २०१९ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद चंद्रपूर यांचे कक्षात  प्रकरणाची सुनावणी ठेवण्यात आली अाहे.

पुरुषोत्तम आस्वले यांची जागा त्यांचे खरेदी खतानुसार १५०० चौ.फूट अाहे चौकशी दरम्यान अधिकार्‍यांना बांधकाम २६५० चौ.फूट आढळले ग्रामपंचायतीचे पदाधिकारीच नियमबाह्य परवागनीचा आधार घेत अतिक्रमण करुन वाणिज्य वापराकरीता गाळे बांधत असतील इतरांना आळा कोण लावतील.प्रशासनीक अधिकारी दोषींवर कारवाई करीता दोन दोन वर्ष लावतात. अशात यांचा कार्यकाळ निघून जात असल्याने शासनाचे नियम व निर्णय धाब्यावरच राहते कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. -हारुण सिद्दिकी, तक्रारकर्ते.

यात तत्कालीन सचिवासह बाराही सदस्यांवर कारवाई केली जाणार आहे उशिरा का होईना अपात्रतेची टांगती तलवार या सदस्यांवर आल्याने काहींचे चांगलेच धाबे दणाणले आहे नियमबाह्य बांधकाम परवागनी मिळवून अतिक्रमण करुन वाणिज्य बांधकाम करणे  चांगलेच अंगलट आले आहे 

सर्वानुमते बांधकाम परवानगी दिली होती उपसरपंचानी त्याचा गैरवापर करुन शेतमालकाने सोडलेल्या नऊ मीटर सर्विस रोडवर अतिक्रमण करुन बांधकाम केले असल्यानेच तक्रार करण्यात आली. यासाठी उपसरपंच दोषी आहे त्यांच्या कृतीमुळे आमचेवर कारवाई करणे योग्य होणार नाही - घागरु कोटनाके,  माजी सरपंच तथा सदस्य