शिवसेना तालुकाप्रमुख पदाची नेमणूक करा शिवसेनेच्या बैठकीत रमेश भिलकर यांच्या नावाचा शिवसैनिकांचा ठराव - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शिवसेना तालुकाप्रमुख पदाची नेमणूक करा शिवसेनेच्या बैठकीत रमेश भिलकर यांच्या नावाचा शिवसैनिकांचा ठराव

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : चिमूर -प्रतिनिधी ( जावेद पठाण )

चिमूर तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमृत नखाते यांच्या उपस्थितीत झाली असता या बैठकीत शिवसेना तालुका प्रमुख पद रिक्त असल्याने तालुका प्रमुख पद नियुक्त करण्याची मागणी केली असता जुने निष्ठावंत शिवसैनिक रमेश भिलकर यांच्या नावाला पसंती देत तालुका प्रमुख पद देण्याची मागणी करण्यात आली. 
   


या बैठकी मध्ये चिमूर तालुका शिवसेना पक्षाच्या सद्याच्या स्थिति चा आढ़ावा घेण्यात आला. मागील विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर शिवसेना तालुका प्रमुख विलास डांगे यांनी पक्षाला रामराम ठोकला व कांग्रेस मध्ये प्रवेश घेतला.तेव्हा पासून चिमूर तालुका प्रमुख पद हे रिक्त असून त्या ठिकाणी तालुका प्रमुख पदा साठी योग्य कार्यकर्त्याची निवड करण्यासाठी  पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख माजी राज्यमंत्री गजानन कीर्तिकर आणि पूर्व विदर्भ समन्वयक अरविंद नेरकर यांच्या सूचने नुसार अमृतराव नखाते शिवसेना उप जिल्हा प्रमुख चिमूर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. 
       
रमेश भिलकर हे मागील 30 वर्षांपासून शिवसेनेत एकनिष्ठेने कार्यरत असल्याने तालुका प्रमुख पद रमेश भिलकर यांना देण्याची मागणी उपस्थित सर्व एकमताने करण्यात आले रमेश भिलकर यांनी शाखाप्रमुख,विभागप्रमुख ,उपतालुका प्रमुख व प्र.तालुका प्रमुख म्हणून जबाबदारी आजपावेतो पार पाडली आहे.पक्ष संघटने विषयी त्यांचे कार्य व पक्षनिष्ठा लक्षात घेता सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या नावा ला सहमति दर्शविली .
        


या बैठकीला  माजी उपजिल्हाप्रमुख अनिल डगवार नागभीड तालुका प्रमुख भोजराज ज्ञानबोनवार, शहरप्रमुख सचिन खाड़े  माजी तालुका प्रमुख भाऊराव ठोम्बरे ,रमेश भिलकर, भाऊराव गोहने,  उपतालुकप्रमुख सचिन शेटये मुकेश चिलमपुलवार,प्रमोद पारखी,देवा मसराम  उपतालुकप्रमुख मोरेश्वर पोइन्कार  अनिल रेवतकर,कमलाकर बोरकर, उपतालुकप्रमुख केवलसिंह जूनी कृष्णकुमार टोंगे, कमलाकर बोरकर ,मनोहर लाटकर, विनोद भूयारकर, सदाशिव नन्नावरे, कवडू खेडकर, विभाग प्रमुख सुरेश गजभे अविनाश मेश्राम,कल्याण ठाकरे ,प्रलय कमाने, उपतालुकप्रमुख विनायक मुंगले,  विभागप्रमुख संतोष कामडी  भिसी शहर प्रमुख नाना नंदनवार ,नेरी शहर प्रमुख वामन बंडे,  युवा सेना उपतालुक प्रमुख किशोर उकुंडे, युवासेना उपतालुकप्रमुख आशीष बगुलकर, दीपक बारेकर,शांताराम ददमल, रतिराम चनोडे, आकाश राउत, सुनील गायकवाड़, नंदू कामडी, गणेश कारे कर,अनिल भिलकर आदि तालुक्यातील आजी-माजी पदा धिकारी व इतर कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते.