पाच वर्षीय मुलावर अत्याचार : आरोपी गजाआड तर दोन महिलांचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

पाच वर्षीय मुलावर अत्याचार : आरोपी गजाआड तर दोन महिलांचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

भद्रावती : शहराच्या भंगारामवार्डात राहणार्‍या आणि व्यवसायाने घर बांधकात टाईल्स बसविणार्‍या एका युवकाने दोन बालकांना पतंग घेवून देण्याचे आमिष दिले. यानंतर एका ५ वर्षीय बालकावर अत्याचार केला. या घटनेची तक्रार स्थानिक पोलीस स्टेशनला मिळताच आरोपीला गजाआड करण्यात आले.

मंगळवारला सायंकाळ च्या सुमारात ही घटना घडली. आरोपी वसीम गफ्फार शेख वय २८ वर्ष याने खेळत असलेल्या सात आणि पाच वर्षीय बालकांना पतंग घेऊन देण्याचे आमीष देवून येथील नगरपालिका कार्यालयाचे मागच्या परीसरात यातील पाच वर्षीच बालकावर अत्याचार केला. सदर बालकांनी या संबंधिची माहिती त्यांच्या पालकांना देताच त्यांनी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली. यानंतर आरोपीवर पास्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून पोलीसांनी आरोपी वसीम गफ्फार शेख याला गजाआड केले.

मूल : तालुक्यातील घोसरी येथील एका व्यक्तीने दोन महिलांना अश्लील भाषेत बोलून त्यांचा विनयभंग केल्याची घटना काल बुधवारला घडली. संबंधीत महिलांनी स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी चंदु दडमल याने गावातील दोन महिलांना अश्लील भाषेत बोलून त्यांच्या विनयभंग केला. तक्रारीनंतर सदर आरोपीवर गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.