शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर यांची चौकशी करून तात्काळ निलंबित करण्याची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, चंद्रपूर ची मागणी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर यांची चौकशी करून तात्काळ निलंबित करण्याची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, चंद्रपूर ची मागणी

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

चंद्रपूर जिल्हयात मा. संजय डोलीकर हे शिक्षणाधिकारी माध्य, रुज् झाल्यापासून यांच्या कार्यकाळात मोठ्या  प्रमाणात अनियमितता झाली असून असून जिल्हयात नियमबाहयपणे शिक्षक व शिक्षकेत्तर पदांना मान्यता देवून करोडो रुपयाचा शासनास चुना लावला. 

कार्यालयात अनेक कर्मचारी दारु पिऊन असतात. त्यांचंवर कोणताच वचक  नाही. कार्यालयातील कोणतेही काम पैसे  मोजल्या शिवाय होत नाही. या कार्यालयात अनेक दलाल सक्रिय असून दलनाला मार्फताच कामं होतात. नियमबाहयपणे दिल्या गेलेल्या मान्यता बॅक डेट  मध्ये देउन आवक जावक रजिस्टर मध्ये  खाडाखोड करून चढविल्या जातात. 


चंद्रपूर जिल्हयात100 टक्के माध्य, शाळा डिजीटल झाल्याचा खोटा अहवाल शासनास सादर करुन शासनाची दिशाभूल करून  स्वत:ची पाठ धोपटून घेतली. प्रत्यक्षात जिल्ह्यात  25 टक्के शाळा ही डिजीटल नाहीत .जिल्ह्यात पट संखेंअभावी मुख्याध्यापक अतिरीक्त झाले असतांना व पद नसतांनाही मुख्याध्यापक पदास मान्यता दिल्या गेल्या. जे कर्मचारी स्वतः कार्यालयात जाऊन संबंधितांना भेटत नाही, अशा कर्मचा-यांच्या फाईल्स कार्यालयातून गायब केल्या जातात. शिक्षकोत्तर कर्मचा-यांच्या पदोन्नती देणे बंद असतांना जिल्हयात मोठया प्रमाणात पदोन्नतीस मान्यता दिल्या गेल्या. अनुकंपा तत्वावरील पदांना बंदी असतांनाही जिल्हयात मान्यता दिल्या गेल्या.जिल्ह्यात मोठया प्रमाणात शिक्षक अतिरीक्त असतांना विनाअनुदानीत वर काम करना-या शिक्षकांना अनुदानीत तुकडी वर बदलीस मान्यता दिल्या गेल्या. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन प्रक्रियेत अनियतिता करुन गैरमार्गाने समायोजन केल्या गेले. 

या बाबत गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्र शिक्षक परिषदेने पुराव्यानिशी व अनियमितता झालेल्या प्रकरणांच्या यादीसहीत मा. शिक्षणमंत्री विनोद तावडे, शिक्षण आयुक्त, व शिक्षण संचालक पुणे. यांचकडे वारंवार तक्रारी करून देखील त्याची दखल घेतल्या जात नव्हती. 


एका मोठ्या राजकीय सत्ताधा-याचा आशीर्वाद असल्यामुळे त्यांची साधी चौकशी ही होत नव्हती. प्रकरण दडपण्याचा आटोकाट प्रयत्न झाला. मात्र शिक्षक परिषदेने पाठपूरावा कायम ठेवल्यामळे मा. आशिषजी शेलार शिक्षणमंत्री झाल्यानंतर याची शासनानं दखल घेतली. व मा. शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपुर यांनी दि. 23 /08/2019 ना मा. मुख्यकार्यपालन अधिकारी जि.प. चंद्रपूर यांना सर्व प्रकरणायी चौकशी  करुन स्यंयंस्पस्ट अहवाल पाठविन्याचे  आदेश झालेत .आजपर्यंत  4 महीण्याचा कालावधी लोटुनही अजून चौकशी अहवाल पाठविण्यात आला नाही.त्यामुळे संबंधित  अधिकारी राजकीय नेत्याचा  हस्तक्षेप करवून  हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत तर नाही ना ? अशी शंका आल्याशिवाय राहत नाही. अशा भ्रष्ठ अधिका-यावर काय कारवाई होते याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.वरील प्रकरणाची योग्य चौकशी न झाल्यास महाराष्ट्र राज्य  शिक्षक परिषद येत्या हिवाळी अधिवेशनात आंदोलन करेन अशा ईशारा जिल्हाध्यक्ष मधुकर मुपाडवार, कार्यवाह रामदास गिरटकर, हरीभाउ गरफडे, अनंत डॉंगे, विलास खोड,गजानन शेळके,मनोहर झाडे, राजेंद्र मोहीतकर, प्रशांत उपलेचवार, दिलींप मंकालबार, विलास वरभे, अतूल केकरे नरेंद्र राऊत, किशोर टेंभूर्ण, सो. संध्या गिरटकर इ. नी दिला आहे.