गोंडपिपरीत पुन्हा एक व्यापारी सापडला अवैध धंद्यात - पोलिसांनी पकडलेल्या दारू तस्करीत निलेश बानोले चालकासहित माल सोडून फरार ! - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गोंडपिपरीत पुन्हा एक व्यापारी सापडला अवैध धंद्यात - पोलिसांनी पकडलेल्या दारू तस्करीत निलेश बानोले चालकासहित माल सोडून फरार !

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :गोंडपिपरी :काल मूखबिरव्दारे मिळालेल्या खात्रीशिर खबरेवरुन दि. ०४.१२.१९ चे ०२.०० वाजे सुमारास इंदिरानगर गोडपिपरी बायपास रोड येथे जावन पंचासह पोलिसांनी नाकाबंदी केली असता एक स्कॉर्पिओ गाडी शिवाजी चौक गोंडपिपरी कइन इंदिरानगर गोंडपिपरी कडे येत असता त्यांना पंच व पोलिस स्टॉफ च्या मदतीने थांबविले असता, स्कारपिओ चालक गाडी थांबवून पळून गेला. 

एक ईसम गाडीत जागीच हाजर मिळुन आला त्यास पोलिसांनी  आपला परीचय देतुन त्याचे नाव गाव विचारले असता त्यानी आपले नाव दिपक उर्फ चन्ना ताताजी चेनेकार वय ३० वर्ष रा.भ.तळोधी ह.मु.गोंडपिपरी असे सांगीतले.


पंचा समक्ष प्राव्हायावत स्कार्पिओ वाहन क.एम.एच.३१ सा.आर.१९१० पाहणा कला असता पाच खडर्याचे बॉक्स व एक चुंगळी मिळुन आली. तिन खडयचि बाक्स मध्ये प्रत्येकी ४८ नग प्रमाणे १४४ नग व एका प्लॉस्टीक चुंगळीत २० नग इम्पेरीयल ब्लु क्लॉसीक ग्रीन व्हिस्की कंपनीच्या प्रत्येकी १८० मिली अशा एकुण १६४ नग इम्पेरीयल ब्लु क्लॉसीक ग्रीन व्हिस्की कंपनीच्या प्रत्येकी १८० मिली किं.४९,२०० /-रू. व दोन खडर्याचे बॉक्स मध्ये ४८ नग प्रमाणे एकुण ९६ नग रिझोम स्पेशल व्हिस्की कंपनीच्या प्रत्येकी १८० मिली किं.१९.२०० रू.चा माल तसेच गुन्हयात वापरलेली स्कारपिओ क.एम.एच.३१ सी.आर.१९१० कि.अ. ४,००,०००रु  असा एकुण ४,६८,४०० रू किंमती चा माल जप्त करण्यात आला.ताब्यात असलेल्या आरोपीला सदर दारू कोणाची आहे याबाबत विचारले असता त्यानी सदर दारू ही निलेश बानोले रा.गोंडपिपरी याची असल्याचे सांगीतले. पाहिजे आरोपी निलेश बानोले व स्कॉपीओ वाहन चालकाचा शोध घेतला असता मिळुन आले नाही. पोलिसांनी तिनही आरोपीविरुध्द गुन्हा नोंदकरुन तपासात घेतला आहे.