बिग ब्रेकिंग न्यूज : बागडी ट्रॅव्हल्स मध्ये तरुणीचा विनयभंग : वाहक मद्यवस्थेत, वरोरा येथे ट्रॅव्हल्स थाबवून पोलिसात तक्रार ! - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बिग ब्रेकिंग न्यूज : बागडी ट्रॅव्हल्स मध्ये तरुणीचा विनयभंग : वाहक मद्यवस्थेत, वरोरा येथे ट्रॅव्हल्स थाबवून पोलिसात तक्रार !

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :वरोरा प्रतिनिधी -नुकताच हैद्राबाद येथे  डॉ. प्रियंका रेड्डी प्रकरण घडल्यानंतर संपूर्ण समाजमन चिंतातुर असतांना नागपूर वरून चंद्रपूर ला येणाऱ्या  बांगडी ट्रॅव्हल्स मधील एका कर्मचाऱ्याने प्रवासी युवतीचा विनयभंग केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

खबरकट्टा ला मिळालेल्या थोडक्यात माहिती नुसार आज दिनांक 5 डिसेंबर 2019 ला  नागपूर येथून सायंकाळी  7 वाजता  चंद्रपूर ला निघालेल्या बागडी या खाजगी ट्रॅव्हल्स  मध्ये एक तरुणी नागपुर येथुन चंद्रपूर ला जाण्यासाठी बसली होती. नागपूर ते वरोरा दरम्यान या तरुणीचा बस मधील कर्मचाऱ्याने विनयभंग केला असल्याची बाब समोर येताच,  ही ट्रॅव्हल्स  वरोरा येथील रत्नमाला चौकात पोहचताच पीडित तरुणीने घटनेची माहिती पोलिसांना दिली.बहुदा वाहक हा दारूच्या नशेत असल्याचे सुद्धा बोलल्या जाते. दरम्यान या नंतर सर्व प्रवाशांसह बस वरोरा पोलीस ठाण्यात आणण्यात आली. वृत्त लिहीत पर्यंत तक्रार आणि गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.Mh 40 BL 0468 हा बस क्रमांक असलेली ट्रॅव्हलिंग  बस रात्री 8.30 ला वरोरा येथे पोहचली. 

खाजगी ट्रॅव्हल्स मधे सुद्धा महिला सुरक्षित नसल्याने अशा खाजगी ट्रॅव्हल्स वर बंदी आणली जावी अशी मागणी आता जनतेकडून होण्याची शक्यता आहे.

खाजगी ट्रव्हेल्समधून अवैध दारू वाहतूक करीत असल्याच्या घटना घडत असतांनाच आता त्या ट्रेव्हेल्स मधे मुली व महिला सुरक्षित नसेल तर शेवटी त्यांचे संरक्षण होणार कसे ? हा प्रश्न निर्माण झाला आहे.