संतांनी समाजजाग्रुतीचे कार्य केले. - सारीपुत्र जांभूळकर - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

संतांनी समाजजाग्रुतीचे कार्य केले. - सारीपुत्र जांभूळकर

Share This
- आदर्श शाळेत संत संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी.

खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -


बालवीद्या शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल यांच्या संयुक्त वीद्यमाने संत संताजी जगनाडे महाराज जयंती कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आदर्श हायस्कूल चे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर ,मुख्याध्यापिका नलीनी पिंगे, आरोग्य शिक्षक नवनाथ बूटले ,राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले यांची प्रामुख्याने उपस्तीथी होती.यावेळी जांभूळकर यांनी संत जगनाडे महाराजांच्या जीवन चरीत्राविषयी विचार व्यक्त केले.ते म्हणाले संतांनी प्राचीन काळापासून समाजजाग्रुतीचे कार्य केले. समाजातील कुप्रथा ,अंधश्रद्धा ,व वाईट विचार सोडून जीवन जगायला शिकविले. या संताची कार्य मानवजातीच्या कल्यानासाठी असते.त्याच्या विचारांची आपल्या दैनंदिन जीवनात वापर करून चांगले जीवन जगले पाहिजे. इतर मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.सरिता लोहबडे या विध्यार्थीनी संताजी च्या जीवन चरीत्रावर सविस्तरपणे माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्र संचालन सहाय्यक शिक्षक प्रशांत रागिट यांनी केले. प्रास्तावीक राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले यांनी केले. तर आभार सहायक शिक्षिका सुनीता कोरडे यांनी मानले.