चार महिण्याच्या गरोदर पत्नीचा खून : पती फरार #murder - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चार महिण्याच्या गरोदर पत्नीचा खून : पती फरार #murder

Share This
खबरकट्टा / यवतमाळ : उमरखेड -


चार महिण्याच्या गरोदर पत्नीचा खून केल्या प्रकरणी मृतक विवाहितेच्या माहेरच्या लोकांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी पतीवर खुनाचा गुन्हा दाखल केला.


प्राप्त महितीनुसार लगतच्या बोरी (मु) येथील शायिस्ता खान अन्सारखान (२०) या गरोदर नवविवहितेचा डोक्यावर अवजड वस्तूच्या मारामुळे अतिरक्तस्त्राव होऊन मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. 


मृतकचा भाऊ सैयद शोएब सैयद अहेमद रा. काजीपुरा उमरखेड यांना काल रात्री २ वाजता अन्सारखान दिलावर खान पठाण (२५) याने शायिस्ताच्याच फोनवरून तिची प्रकृती खराब झाल्याचे सांगून मोबाईल बंद केला. घाबरलेल्या शोएब व परिवारातील सदस्यांनी अन्सारच्या मोबाईलवर फोन लावला मात्र तो बंद होता. आज सकाळी एका नातेवाईकाने शायिस्ताची प्रकृती जास्त खराब असल्याचा निरोप दिल्याने तिचे पालक बोरी येथे आले. यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शायिस्ताचा मृतदेह, घटनास्थळावरील परिस्थिती व घटनेनंतर जावई फरार झाल्याने त्यानेच मुलीचा खून केल्याचा संशय व्यक्त करून पोलिसांना तशी तक्रार दिली. त्यामध्ये लग्नानंतर मुलीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला त्रास दिल्या जात असल्याचे नमुद केले. दरम्यान अन्सार हैद्राबादला असतांना शायिस्ताची तब्येत खराब असल्याच्या कारणावरून अनेकदा माहेरी उमरखेड येथेच पाठविण्यात येत होते.