खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -
राजुरा शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या समोरील चौकाला 2 डिसेम्बर 2019 ला दिलेल्या "संविधान चौक " या नावाने नामकरण करण्यात यावे,अशी मागणी नगर परिषद राजुरा येथे केली होती.
त्या अनुषंगाने राजुरा नगर परिषद येथे नगराध्यक्ष अरुण धोटे व सर्व नगरसेवकांनी दिनांक 10 /12/2019 ला हा ठराव प्रस्ताव ठेवल्यानयर, दिनांक 12/12/2019 च्या बैठकीत सर्वानुमते ठराव पारित करून मागणी पूर्ण करण्यात आली असून लवकरच पंचायत समिती, गडचांदूर रोड वरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील "संविधान चौक" नामकरण फलक बसविण्यात येणार आहे.
या निमीत्ताने मागणी करणाऱ्या राजुरा येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नागराध्यक्ष अरुन धोटे न.प. यांची भेट नगरपरिषद घेऊन अवघ्या पंधरवड्यात मागणी पूर्ण केल्याबद्दल आभार मानले.