ती हत्या "पाण्याच्या वादातून" ! : मनपा प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची गोंडवाना विदर्भ मुक्ती संघटनेची मागणी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ती हत्या "पाण्याच्या वादातून" ! : मनपा प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची गोंडवाना विदर्भ मुक्ती संघटनेची मागणी

Share This
चंद्रपूर येथील भिवापूर वॉर्डात पाणीभरण्यावरून वाद झाला. या वादात एका युवकाने रॉडनेहल्ला करून 65 वर्षीय वृद्धाची हत्या केली. या साठी महानगरपालिकेकडून करण्यात येणारा अनियमित पाणीपुरवठा जबाबदार आहे. त्यामुळे मनपा प्रशासनावरसदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीगोंडवाना विदर्भ मुक्ती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून पिण्याच्या पाण्यासाठी रक्त सांडल्याच्या प्रकाराने शहरातील पाणी प्रश्न गंभीर असल्याची बाब पुन्हा समोर आली आहे.
खबरकट्टा / चंद्रपूर :शहर प्रतिनिधी -चंद्रपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उज्वल कस्ट्रकशन कंपनीचे कंत्राट  रद करण्यात आले. त्यानंतर महानगरपालिका प्रशासनाकडून शहराला पाणीपुरठा केला जात आहे. मात्र, आजही अनेकप्रभागात अनियमित पाणीपुरवठा होत आहे. 

त्यामुळे नागरिकांमध्ये पाणीभरण्यावरून वाद होत आहेत. असाच प्रकार शहरातील  भिवापूर प्रभागात दोन दिवसां पूर्वी घडला. अधिक पोलीस तपासात अक्षय मुळे (वय 23)आणि जोगेदसिंग टाक(क्य 65) यांच्यातबाद झालाया वादात अक्षय मुळे याने लोखंडी रॉडने टाक यांच्यावरहल्ला केला. यात टाक यांचा मृत्यू झाला.

या घटनेला महानगरपालिकेचे अनियमित पाणी पुरवठा धोरण जबाबदार असल्याचा आरोप गोंडवाना विदर्भ मुक्ती संघटनेच्या  वतीने करण्यात आले आहे.या प्रकरणा ची चौकशी करून महापालिकेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा , अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष अनिरुद्ध तपासे, अध्यक्ष स्नेहल लोखंडे यांनी निवेदनातून दिला आहे.भिवापूर येथे घडलेल्या हत्याकांडात अक्षय मुळे या युवकाने जोगेंद्रसिंग टाक यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. यात टाक याचा मृत्यू झाला. नळाचे पाणी भरण्यातून हावाद झाला.-श्री. बहापुरे,पोलिस निरीक्षक, शहर पोलिस ठाणे