खबरकट्टा / थोडक्यात :
वेस्ट इंडिजविरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारताने विजय मिळवत मालिका जिंकली आहे. तिसऱ्या सामन्यात भारताने विंडीजचा 4 विकेट राखून पराभव केला. यासोबत भारताने तीन सामन्यांची वनडे मालिका 2-1 ने जिंकली. वेस्ट इंडिजने भारतासमोर 316 धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने चार गडी राखून हे आव्हान पूर्ण केले. भारताकडून रोहितने 63 , के एल राहुलने 77 आणि विराट कोहलीने 85 धावांची खेळी केली.