शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मदतीने अज्ञात रुग्णाला मिळाला परिवार ! - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मदतीने अज्ञात रुग्णाला मिळाला परिवार !

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर च्या अस्थि रोग विभागात दिनांक 7 नोव्हेंबर 2019 ला एक रुग्ण बेहोशीच्या अवस्थेत वरोरा पोलीस द्वारे दाखल करण्यात आला होता परंतु वरोरा पोलिसांना रुग्ण पूर्णतः बेहोशीच्या अवस्थेत असल्याने व आसपास कोणताही नातेवाईक चौकशी करिता पोलीस स्टेशन ला न आल्याने रुग्णाची ओळख पटत नव्हती.

परंतु रुग्णालयात दाखल करताच, तेथील डॉक्टर व चमूने या अनोळखी रुग्णाचा योग्य उपचार करत त्याची सुश्रुषा केली. या रुग्णाला होश येऊन प्रकृतीत थोडी सुधारणा झाल्यावर समन्वय अधिकारी भास्कर झलके व समाजसेवा अधीक्षक राकेश शेंडे यांनी भेट घेऊन माहिती घेतल्यावर सदर रुग्णाचे नाव ओरील हुय्या (वय 45) रा, पपरो, ठाणे -चौपारन जिल्हा हजारीबाग राज्य  झारखंड.
या माहितीच्या आधारावर रुग्णाच्या नातेवाईकांना शोधण्याकरिता शहर पोलीस स्टेशन चंद्रपूर व वरोरा यांना पत्र दिले. सोशल माध्यमांचा वापर करत रुग्णाने दिलेल्या पत्त्याच्या आधारे हजारीबाग पोलीस अधीक्षकांचा वैयक्तिक मोबाईल क्रमांक घेऊन त्यांना रुग्णाचा फोटो व पूर्ण माहिती पाठविल्यानंतर त्यांनी लगेच चौपारन ठाण्यात माहिती देऊन परिवाराला कळविल्याने तात्काळ त्यांची दोन्ही मुले गोपाल व निरंजन हे हजारीबाग येथून चंद्रपूर ला आले व भेट घेतली आपले वडील कित्येक महिन्यांपासून गायब होते व आमचं शोध सुरु होता.   
रुग्णाचा पूर्ण उपचार झाल्यावर 28 नोव्हेंबर ला सुट्टी करण्यात आली.या अज्ञात रुग्णाला  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. एस एस मोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. हजारें यांच्या तत्पर मार्गदर्शनाखाली समन्वय अधिकारी भास्कर झलके व समाजसेवा अधीक्षक राकेश शेंडे यांनी सफल योगदान दिले.