चा विरोध- इंटरनेट बंदीवर आंदोलकांनी शोधला आश्चर्यकारक पर्याय - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चा विरोध- इंटरनेट बंदीवर आंदोलकांनी शोधला आश्चर्यकारक पर्याय

Share This
खबरकट्टा / थोडक्यात :


देशभरात CAA ला जोरदार विरोध होत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा बंद केली जात आहे. यावरही आंदोलकांनी हाँगकाँग निर्दशकांसारखाच तोडगा काढला. आंदोलक इंटरनेटशिवाय चालणाऱ्या ब्रिजफाय, फायर चॅटसारख्या मेसेजिंग अ‍ॅप्सचा वापर करून आपले आंदोलन पुढे नेत आहेत. हे दोन्ही अॅप्स विनाइंटरनेट ब्लू टूथच्या माध्यमाने चालतात. आसाममध्ये 11 दिवसापासून इंटरनेट बंद आहे. तेव्हा ब्रिजफाय डाऊनलोडचे प्रमाण 80% वाढले.

नागरिकत्व कायद्याच्या निषेधार्थ दिल्लीत विद्यार्थी संघटना, सामाजिक कार्यकर्त्यांचे तसेच डाव्या पक्षांचे निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनाला नियंत्रित करण्यासाठी अनेक ठिकाणी अनेक भागांमध्ये कलम १४४ लावण्यात आले. मोबाईल सेवा अनेक तासांसाठी बंद करण्यात आली.