खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -
कॅब आणि एन आर सी विरोधात सकल मुस्लिम तसेच बहुजन समाज राजुरा तर्फे निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात मुस्लिम समाज सोबत विविध सामाजिक संस्था नी सहभाग घेऊन या बील चा निषेध व्यक्त करण्यात आले.
सद्या देशात कॅब आणि एन आर सी कायदा विरोधात ठीक ठिकाणी मोर्चे व निदर्शने रॅली काढून सरकार विरोधात आपले निषेध व्यक्त केल्या जात आहेत. राजुरा शहरात सुधा या बील विरोधात सकल मुस्लिम आणि बहुजन समाज राजुरा तर्फे निषेध मोर्चा काढण्यात आले.
या वेळी भारत सरकारच्या वतीने नागरिक संसोधन बील संसदेत पारित करून संविधानाच्या कलम 14,15 आणि 21 चे उलघन केले आहे. हे बील फक्त मुस्लिम समाज विरोधात वंचित घटक यांच्या सुद्धा विरोधात आहे. त्यामुळे आज या बील विरोधात मुस्लिम समाज सोबत देशातील वंचित घटक सुद्धा या बील विरोधात रस्त्यावर येऊन निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
या कॅब आणि एन .आर .सी . संविधान विरोधात असलेल्या कायदा विरोधात शहरातील सुफी शहा दर्गा पासून मोर्चाच्याची सुरवात होऊन नाका नंबर 3, भारत चौक, गांधी चौक नेहरू चौक, उइके चौक पंचायात समिती यथे डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तेहसिल कार्यालय येथे समारोप करण्यात आले.
या निषेध मोर्चा मध्ये शहरातील माज्जिद चे इमाम, मौलाना,तसेच . समस्त मुस्लिम समाज व बहुजन समजचा समावेश होते.