भारत सरकारच्या नावे विविध शासकीय विभागाच्या खोट्या कागदपत्रे व नकली रबर स्टॅम्प वापरून नौकरी लावून देण्याच्या नावाखाली आदित्य भाके बेरोजगार युवकांची फसवणूक ! पोलिस अधीक्षकांकडे तक्रार . - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

भारत सरकारच्या नावे विविध शासकीय विभागाच्या खोट्या कागदपत्रे व नकली रबर स्टॅम्प वापरून नौकरी लावून देण्याच्या नावाखाली आदित्य भाके बेरोजगार युवकांची फसवणूक ! पोलिस अधीक्षकांकडे तक्रार .

Share This

 • भारत सरकार - मिनिस्ट्री ऑफ फायनान्स डिपार्टमेंट ऑफ रेव्हेनु (केंद्रीय उत्पात व सीमा शुल्क विभाग -सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साईझ अँड कस्टम च्या नावानी बनावटी कागदपत्रे व ऑर्डनन्स फॅक्टरी च्या खोट्या रबरी स्टॅम्प मारून दिले जाते निवड पत्र. 
 • निवड पत्रात सदर व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करिता निवड झाल्याचे नमूद 
 • आदित्य भाके याने नौकरी लावून देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांनी बेरोजगार युवकांची फसवणूक ! पोलिस अधीक्षकांकडे  तक्रार 
 • राजुरा पोलिस स्टेशन मधे होणार गुन्हा दाखल ! 

खबरकट्टा / चंद्रपूर : केंद्र शासनाच्या केंद्रीय उत्पाद आणि सिमा शुल्क बोर्डसह अनेक खात्याचे बनावट व बोगस पत्र तयार करून  चंद्रपूर जिल्ह्यातील बेरोजगार यांना दाखवायचे आणि आपल्याकडे केंद्रीय आणि राज्य शासनाच्या भरती मधे अधिकारी आहेत जे हमखास नौकरी देतात असे आमिष दाखवून बेरोजगार युवकाकडून लाखो रुपये उकळणाऱ्या राजुरा येथील तथाकथित पत्रकार आणि राजकीय नेता म्हणून मिरवीणारे सर्वच राजकीय पक्ष फिरून शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस मधून जाऊन  सध्या भाजपा युवा नेते आदित्य भाके यांच्या विरोधात आज दिनांक ११ डिसेंबरला फसवणूक झालेल्या सतीश थेरे, धनराज हेपट, आणि सचिन गौरकार यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडे तक्रार देवून आदित्य भाके यांच्यावर गुन्हे दाखल करा व आम्हची आर्थिक फसवणूक झाली ते पैसे परत मिळवून द्या अशी मागणी केली आहे.आदित्य भाके हे एका पत्रकार संघाचे तथाकथित पदाधिकारी असून एका राजकीय पक्षात सुद्धा ते सक्रिय आहे. आणि त्यामुळेच त्यांनी पदाचा फायदा घेऊन अनेक बेरोजगार युवकांना नौकरीचे आमिष दाखवले भारत सरकार - मिनिस्ट्री ऑफ फायनान्स डिपार्टमेंट (Ministry Of Finance, Department Of Revenue )ऑफ रेव्हेनु (केंद्रीय उत्पात व सीमा शुल्क विभाग -सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साईझ अँड कस्टम-सेंट्रल Borard Of Excise and Customs) च्या नावानी बनावटी कागदपत्रे व ऑर्डनन्स फॅक्टरी च्या खोट्या रबरी स्टॅम्प मारून, निवड पत्र दिले, निवड पत्रात सदर व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करिता निवड झाल्याचे नमूद आहे आणि त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे. त्यानी केंद्र शासन तथा राज्य शासनातील अनेक विभागाचे बनावट पत्र बनवून व ते बेरोजगार युवकांना दाखवून लाखो रुपयांनी लुबाडणूक केल्याचे प्रकरण सामोरं आले आहे. या संदर्भात आदित्य भाके यांनी ज्या बेरोजगार युवकांकडून लाखो रुपये घेतले त्यांना बाकायदा तितक्या रुपयाचे बोगस चेक सुद्धा दिले आहे. 

त्यामुळे जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडे पिडीत बेरोजगार यांनी तक्रार दिल्याने आता राजुरा पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती आहे.