सन्मान योजना निधी पासून मूल तालुक्यातील अनेक शेतकरी वंचित - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सन्मान योजना निधी पासून मूल तालुक्यातील अनेक शेतकरी वंचित

Share This

मुल तालुक्यातील बर्याचशा शेतकर्यांना शेतकरी सन्मान योजना निधी अजुनही मिळाला नसून आठवड्याभरात लाभ देण्याची मागणी अनेक शेतकऱ्यांच्या वतीने उलगुलान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन केली आहे. खबरकट्टा / चंद्रपूर : मूल -

              
     
मुल तालुक्यातील बर्याचशा शेतकर्यांना अजुनही शेतकरी सन्मान निधीचा एकही पैसा मिळाला नाही सर्व शेतकरी प्रधानमंत्री क्रुषी योजनेतंर्गत शेतकरी सन्मान निधी योजनेचे फार्म मागिल वर्षातच भरले होते. परंतु आजपावेतो शेतकर्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. कित्येक दिवस होऊनही प्रशासनीय स्तरावर ही योजना अमलात आणुन याबाबत मोठी अनियमीतता आढळुन येत आहे. 

ज्या शेतकर्यांना ह्या योजनेचा लाभ मिळायला पाहीजे त्या शेतकर्यांना अजुनही या योजनेचा लाभ मिळला नाही . तरी याची रितसर चौकशी करुन ज्या शेतकर्यांनी या योजनेचा लाभ मिळणार आहे अशा मुल तालुक्यातील सर्व शेतकर्यांना या योजनेचा लाभ तात्काळ मिळवुन द्यावा.
   
करिता मुल तालुक्यातील काही शेतकर्यांनी मा.तहसिलदार मुल यांचेकडे निवेदन देऊन मागणी केली.
 
जर एका आठवड्याच्या आत सदर योजनेचा लाभ मिळाला नाही व प्रशासनीय स्तरावरुन कोणतीही कारवाई झाली नाही तर मुल तालुक्यातील लाभ न मिळालेल्या सर्व शेतकर्यांना घेऊन तिव्र आंदोलन करणार असा ईशारा शेतकर्यांनी प्रशासनाला दिला.
   
निवेदन देतांना उलगुलान संघटनेचे जिल्हा संयोजक प्रशांत उराडे, ठगसेन मिसार,देवराव पाटेवार,मल्लाजी मिडपल्लवार,शंकर मर्लेवार,मुर्लिधर पोरटे,सुखदेव चिंचोलकर,शामराव पोरटे,विमलबाई मर्लेवार,नितिन तांगडे,दुधराम चिंचोलकर तथा अन्य शेतकरी उपस्थीत होते.