डॉ.प्रियंका रेड्डी यांच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी तहसिलदार यांना निवेदन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

डॉ.प्रियंका रेड्डी यांच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी तहसिलदार यांना निवेदन

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर जिवती - संतोष इंद्राळे
हैद्राबादच्या शाहाबाद येथे घडलेल्या डॉ.प्रियंका रेड्डी यांच्यावर काही नराधमांनी सामूहिक बलात्कार करून तिला जिवंत जाळून टाकण्यात आले.ही घटना माणूसकिला काळीमा फासणारी घटना आहे.या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे.
                 

अश्या दोषी आरोपिंना फाशीची शिक्षा देण्यात यावी.तसेच यु.पी.मधील हरदोई मध्ये सात वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. तसेच दिल्ली येथिल गुलाबीबाग येथे चहाचे दुकान चालविणाऱ्या पंच्चावन वर्षाच्या महिलेवर सुद्धा अत्याचार करून तिची पण हत्या करण्यात आली या तिन्ही ही घटनेचा निषेध म्हणून आज दोषी आरोपींचा खटला जलद गतीने न्यायालयात दाखल करून त्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी जेणे करून अश्या घटनांची पुनरावृत्ती समाजामध्ये होणार नाही.म्हणून आज श्री.अमर राठोड मित्रपरिवार व भारतीय मुस्लिम परिषदे तर्फे प्रशांत बेडसे.तहसिलदार जिवती यांच्या मार्फत हे निवेदन  केंद्रीय गृहमंत्री भारत सरकार यांना पाठविण्यात आले आहे.
             

तसेच कॅण्डल मार्च काढून डॉ.प्रियंका रेड्डी यांच्यावर झालेल्या अवमानिय घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला,यावेळी  सौ.वर्षा गुरमे,अश्विनी गुरमे,मा.पुष्पाताई नैताम,नगराध्यक्ष न.प.जिवती सरिता तावाडे,लालिबाई माध्यमिक हायस्कूलच्या सर्व विद्यार्थीनी व  गावातील अनेक महिलांची उपस्थिती  होती.