ऐतिहासिक नाणे व डाक तिकीटे प्रदर्शनी मध्ये सिंगल युझ प्लास्टिक फ्री इंडिया साठी जनजागृती-राष्ट्रीय सेवा योजना पथकाचा उपक्रम - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ऐतिहासिक नाणे व डाक तिकीटे प्रदर्शनी मध्ये सिंगल युझ प्लास्टिक फ्री इंडिया साठी जनजागृती-राष्ट्रीय सेवा योजना पथकाचा उपक्रम

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -


श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथील राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या स्वयंसेवकांनी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सिंगल युझ प्लास्टिक फ्री इंडिया साठी कंबर कसलेली आहे. 


राजुरा येथे दिनांक 12 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2019 दरम्यान पार पडलेल्या ऐतिहासिक नाणे व डाक तिकीटे प्रदर्शनी 2019 ला भेट देणाऱ्या असंख्य जनमानसाना प्लास्टिक प्रदूषणाची जाणीव व्हावी, त्याचे दुष्परिणाम माहिती व्हावे सोबतच दैनंदिन वापरात कमीतकमी प्लास्टिकचा वापर करावा यासाठी, शक्य तिथे प्लास्टिक चा वापर टाळावा अशी जनजागृती करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या स्वयंसेवकांनी प्रकल्प तयार करून विविध प्रात्यक्षिकातून प्लास्टिक पृथ्वीवरील प्रत्येक घटकासाठी कसे घातक आहे हे पटूवून देण्याचा उपक्रम केला.

या प्रदर्शनी ला राजुरा शहरातील विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, सर्वसामान्य जनता भेट देऊन दुर्मिळ ऐतिहासिक नाणे व डाक तिकीट बद्दलची माहिती जाणून घेत आहेत, सोबतच राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या स्टॉल ला भेट देऊन सिंगल युझ प्लास्टिक फ्री इंडिया बद्दल माहिती रासेयो स्वयंसेवकांकडून जाणून घेतले.


पहिल्या दिवशी राजुरा नगरपरिषद च्या मुख्याधिकारी मा. आर्शिया जुही यांनी स्टॉल ला भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले आणि सर्वानी प्लास्टिक फ्री इंडिया साठी पुढाकार घेतला पाहिजे असे मत व्यक्त केले.

उपविभागीय वनपरिक्षेत्र अधिकारी श्री अमोल गरकल साहेबानी या स्टॉल ला भेट देऊन स्वयंसेवकांचे कौतुक केले व स्वयंसेवकांनी अश्या जनजागृतीच्या कार्यात पुढाकार घेत जनमानसात जनजागृती केल्याशिवाय आपल्या समाजात जनजागृती होणार नाही तसेच प्लास्टिक च्या वापराबद्दल ची जनजागृती अतिशय महत्वाची आहे असे मत व्यक्त केले.


राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास दा. बल्की यांच्या मार्गदर्शनाखाली कु. अंकिता खुजे, संतोष निरांजने, प्रिया सिंग, प्रिती सिंग, यांनी सिंगल युझ प्लास्टिक फ्री इंडिया वर प्रात्यक्षिकातून जनजागृती साठी प्रकल्प तयार केला तर मृणाल देरकर, मृणाली उरकुडे,मेघा लोनगाडगे कोमल देवाळकर, कशीफ शेख, परवेज बेग, बालाजी ताजने, यश वर्मा, आनंद भटारकार, नमिरा सय्यद, विशाल शेंडे, हरिदास बांदूरकर, उज्वला गेडाम, प्रतीक्षा पडवेकर, प्रतीक डाखरे, विद्या रागीट, शुभम पत्रकार, दीपक राजूरकर, अमोल चहारे इत्यादी स्वयंसेवकांचे रोज प्रदर्शनी मध्ये उपस्थित राहून सहकार्य लाभले.