जिल्हापरीषद शाळेचे शिक्षक - शिक्षिका रेशनच्या धान्याचे लाभार्थी तर अनेक गोरगरीब धान्यापासून वंचित ! - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्हापरीषद शाळेचे शिक्षक - शिक्षिका रेशनच्या धान्याचे लाभार्थी तर अनेक गोरगरीब धान्यापासून वंचित !

Share This
कोरपना तालुक्यातील नांदा येथील रास्तभाव दूकानात चक्क  जिल्हापरीषद शाळेचे शिक्षक शिक्षिकेच्या नावावर मागील वर्षभर्‍यापासुन रेशनचे धान्य उचल करीत असल्याची माहीती समोर आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत अाहे याबाबत अन्न पुरवठा विभागाकडे तक्रार करण्यात आली असून कारवाईची मागणी होत आहे. 
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना -

नांदा येथील रास्तभाव दुकानाचा परवाना किसन गोन्डे यांचे नावाने असून ते स्वत: कामकाज पाहतात मागील वर्षी त्यांचे रास्त भाव दुकानाशी संलग्नीत ज्या शिधापत्रिकाधारकांचे वार्षिक उत्पन्न ५९०००/- रुपयाचे अात आहे अशा काही शिधापत्रिका अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट करण्यात आल्या यासाठी विशेष प्रपत्र तयार करुन त्यावर ग्रामपंचायतीचे सरपंचाची स्वाक्षरी घेण्यात आली होती.

किसन गोन्डे हे आधी अल्ट्राटेक कंपनीत नोकरीवर होते नंतर त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली  त्यांचेकडे मोठ्याप्रमाणात शेती आहे त्यांचे स्वत:चे उत्पन्न लाखो रुपये आहे असे असतांना सुद्धा किसन गोन्डे यांनी स्वत:चे नावाने असलेली शिधापत्रिका अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करवून घेतली.

किसन गोन्डे यांचा मुलगा विठ्ठल गोन्डे व सुन छाया गोन्डे हे दोघेही जिल्हा परीषदेच्या शाळेवर शिक्षक शिक्षिका अाहेत सद्या दोघही गोंडपिपरी पंचायत समीती अंतर्गत विठ्ठलवाडा व लगाम या शाळेवर कार्यरत आहेत सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतलेल्या माहितीतून माहिती मिळाली की किसन गोंडे हे शिक्षक शिक्षिकेच्या परीवाराचे नावावर धान्याची उचल करीत आहेत.


एकीकडे नांदा गावातील निराधार , वंचित व गोरगरिबांची नावे अन्न सुरक्षा योजनेत नसल्याने त्यांन‍ा धान्य मिळत नाही तर दुसरीकडे शासकीय नोकरीवर असणारे अनेकजण रेशनचे धान्य उचलतात किसन गोन्डे यांनी स्वत:कडे असलेल्या रास्त भाव दुकानाच्या परवान्याचा गैरफायदा घेऊन अनेक गर्भश्रीमंत लोकांची नावे अन्नसुरक्षा योजनेत घेऊन शासनाची दिशाभूल केली असल्याचा आरोप तक्रारकर्त्यांने केला असुन शासनाने चौकशी करुन त्यांचा रास्तभाव दुकान परवाना रद्द करुन महिला बचत गटाला दुकान देण्याची मागणी केली आहेत कोरपना तालुक्याचा अन्नपुरवठा विभाग आता काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहेत.

वारंवार करताहेत काळाबाजारी-
सन २०१५ व २०१७ मध्ये धान्याचा काळाबाजार व अफरातफर केल्याने दोनदा गोन्डे यांचा परवाना रद्द केला होता आयुक्तांनी दुसर्‍यांदा संधी नाकारली किसन गोन्डे मंत्रालयातुन दुकान मिळविण्यात यशस्वी झाले मात्र त्यांनी धान्याची काळाबाजारी करण्याचा उपक्रम बंद करण्या ऐवजी सुरुच ठेवला गावातील कोणती व्यक्ती अन्नसुरक्षा योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे याची माहीती रास्तभाव दुकानदाराला असते ही माहिती अन्नपुरवठा विभागाला दिली पाहिजे पण तसे न करता स्वत:च शासकीय नोकरीवर असणार्‍यांचे नावाने धान्याची उचल करतात हि बाब समर्थनीय नसून फसवणूक करणारी आहे पुरवठा विभागाने कारवाई करायला पाहीजे-राजू बाळकृष्ण काळे,  नांदा