महावितरणचे ट्रान्सफार्मर डी पी हटविण्याची मागणी : जीवितहानी होण्याची शक्यता - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

महावितरणचे ट्रान्सफार्मर डी पी हटविण्याची मागणी : जीवितहानी होण्याची शक्यता

Share This
-चिमूर शहरातील प्रभाग क्रमांक १२ व १४ मधील अंगणवाडी क्रमांक ९ व हनुमान मंदिर समोरील महावितरणचे ट्रान्सफार्मर डी पी  हटविण्याची मागणी :जिवितहानी होण्याची शक्यता !


  
खबरकट्टा / चंद्रपूर : चिमूर- प्रतिनिधी ( जावेद पठाण )

नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या प्रभाग क्रमांक १४ व १२ मधील हनुमान मंदिर आबादी प्लांट नेहरू वॉर्ड मेहरकुरे मोहल्ला गुरुदेव किराणा जवळ असलेल्या अंगणवाडी क्रमांक ९ इथे लहान मूल आपल्या आई वडिलांच्या आत्मविश्वास व पालन करून आई पहिल्या महिन्या पासून तर वयाच्या ५ वर्षापर्यंत आंगणवाडी सेविका लहान मुलांचा जोपासना करतात.
परंतु चिमूर नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या प्रभाग क्रमांक १२ व १४ येते असलेल्या अंगणवाडी क्रमांक ९ समोरील महावितरण चे २ ट्रान्सफार्मर आहेत व या अंगणवाडीचा बाजूला हनुमान मंदिर आहे व या अंगणवाडीतील लहान मूल बाहेर खेळत असतात व समोर असलेल्या  ट्रान्सफार्मर चे केबल बाहेर निघुन आहे तरी उद्या मोठी जीवितहानी व  वित्त-हाणी नाकारता येत नाही.


यातुन कोणाला ईजा होऊ नये म्हणून प्रभाग क्रमांक १२व १४ सर्व नागरीकांनी ह्या गोष्टीची दक्षता घेऊन असलेल्या महावितरण चे ट्रान्सफार्मर हटवन्यासाठी. हनुमान मंदिर कमेटी व वार्डातील नागरिक मागणी  करीत  मागणी आहे.