घुग्गुस येथील विद्यार्थिनी कु.आर्थिका उपाध्ये राज्य कराटे स्पर्धेत गोल्ड जिंकून प्रथम : जबलपूर येथे आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

घुग्गुस येथील विद्यार्थिनी कु.आर्थिका उपाध्ये राज्य कराटे स्पर्धेत गोल्ड जिंकून प्रथम : जबलपूर येथे आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : घुग्गुस -


क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य स्तरीय आंतर शालेय कराटे क्रीडा स्पर्धेत घुग्घुस च्या एकूण 7 विद्यार्थ्यांनी नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करीत 5मेडल जिंकले.त्यात माउंट कार्मेल कॉन्व्हेंट, घुग्घुस येथील कु.आर्थिका संजय उपाध्ये वर्ग 10वा हिने  अंतिमसामन्यात मुंबई च्या खेळाडूला 7-5 च्या फरकाने धूळचारत गोल्ड मेडल जिकले.

सोबतच जनता विद्यालय घुग्घुस येथील कु. शुभंगीनी शंकर गोगुला, कु. प्रतीक्षा बालाजी सरोदे वर्ग 11वा हिने द्वितीय सिल्वर मेडल तर नरेश दानबहादूर थाल वर्ग 11 वा याने ब्रॉन्झ मेडल जिंकले.

नारायणा विद्यालय पडोली येथील अक्षय विनोद पोद्दारवर्ग 11वा याने बॅझ मेडल जिंकले. माउंट कर्मेल कॉन्व्हेंट घुग्घुस च्या कु. श्रद्धा अनिलकुमार गुप्ता वर्ग12वा, मनमित वामन हरडे वर्ग 8 वा यांना चवध्याक्रमांकावर समाधान मानावे लागले.


यातील कु. आर्थिका संजय उपाध्ये ही जबलपूर येथे आयोजित नॅशनल स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार असून घुग्घुस च्या नागरिकांसाठी खूप अभिमानाची बाब आहे. सर्व खेळाडू डिस्ट्रिक कराटे असोसिएशनं चे सदस्य असून त्यांना प्रशिक्षक म्हणून श्री. विनय बबनराव बोढे,  श्री. मोनिश कमलाकर हिकरे,श्री. मूहाफीझ सिद्दीकी, धनंजय सहारे, संजय उपाध्ये यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व विजयी स्पर्धकांनी आपल्या यशाचे श्रेय आपापल्या प्राचार्यांना, शारीरिक शिक्षक तथा आईवडिलांना दिले.