ब्रेकिंग न्यूज : स्वस्तधान्य दुकानाचे राशन वाहतूक करणारे ट्रॅक्टर पलटून युवकाचा जागीच मृत्यू तर दोघे जण गंभीर जखमी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग न्यूज : स्वस्तधान्य दुकानाचे राशन वाहतूक करणारे ट्रॅक्टर पलटून युवकाचा जागीच मृत्यू तर दोघे जण गंभीर जखमी

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रम्हपुरी -



ब्रम्हपुरी  तालुक्यातील गायडोंगरी -मेंड़कि जवळ राशन वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरने अनियंत्रित होऊन  अचानक  पलटी घेतल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली. 



सविस्तर वृत्त असे की ब्रम्हपुरी वरून स्वस्तधान्य दुकानाचे राशन एकारा गावामध्ये घेऊन जाणाकरिता ट्रॅक्टरने वाहतूक करीत होते.तेव्हा अचानक राशन भरलेल्या ट्रॅक्टरने मेंडकी -गायडोंगरी मार्गावर पलटी घेतल्याने एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले.जखमींना ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मयूर गजानन सहारे वय वर्ष २५ असे मृतक युवकाचे नाव असुन नांदगाव (जाणी) गावातील आहे.तर दोघे जखमीचे नावे वृत्त लिहिपर्यंत कळू शकले नाही.घटनेचा पुढील तपास संबंधित पोलीस विभाग करीत आहे.