काम अपूर्ण असतांना पूर्ण झाल्याचे रात्रीच्या अंधारात लावले फलक : शासकीय नियमांचे उल्लंघन करून संपूर्ण देयकांची उचल केली असावी शक्यता ! - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

काम अपूर्ण असतांना पूर्ण झाल्याचे रात्रीच्या अंधारात लावले फलक : शासकीय नियमांचे उल्लंघन करून संपूर्ण देयकांची उचल केली असावी शक्यता !

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :चिमूर - प्रतिनिधी ( जावेद पठाण )


चिमूर नगर परिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक.१० मधील मिसार कॉलोनी येथील सिमेंट काँक्रीटीकरण रोड व नाली चे काम एक साईट पूर्ण झाले असून  एक साईट च्या नाली चे काम झालेच नाही, हे काम देवाळकर ठेकेदार ( कंत्राटदार ) यांना देण्यात आले होते कामाची किंमत रु २४९.७० लक्ष आहे. 


हे काम  सण २०१६ - १७ वर्षातील आहे . काम झाले नाही आणि काम पूर्ण झाल्याचा फलक कसा काय रात्रीच्या अंधारात लावल्या गेला फलक ? अशी चर्चा नागरिक करीत आहे त्या कंत्राटदारा विरुद्ध अनेक तक्रारी करण्यात आल्या असून आणि प्रभाग क्रमांक . ७ ते १७ मधील प्रभागात सिमेंट काँक्रीट रोड व नाली चे बांधकाम योग्य पध्दतीने केल्या गेले नसून शासकीय नियमांचे उल्लंघन करून संपूर्ण देयकांची उचल केली असावी व उचल केली नसेल तर परिपूर्ण कामाची रितसर चौकशी करून काम चुकीच्या पद्धतीचे आढल्यास कंत्रातदारावर कारवाई करून काळ्या यादीत नाव समाविष्ट करण्यात यावे अशी चिमूर शहर वासिय जनतेत चर्चा सुरु आहे. 

 याकडे नगर परिषद मुख्याधिकारी तसेच कार्यकारी अभियंता नागभीड यांनी दुर्लक्ष न करता आवर्जून याकडे लक्ष देण्याची गरज आहे.