चंद्रपुरात ११ डिसेंबर ते १५ डिसेंबर - झाडीपट्टी नाट्यमहोत्सव : ‘भूक’, ‘जागल्या’,'सुंदर माझ घर', 'वनवा पेटला क्रांतीचा', 'मारलं लेकरू', ‘कष्टाची शिदोरी’,‘घायाळ पाखरा’ अश्या अनेक नाटकांची मोफत मेजवानी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपुरात ११ डिसेंबर ते १५ डिसेंबर - झाडीपट्टी नाट्यमहोत्सव : ‘भूक’, ‘जागल्या’,'सुंदर माझ घर', 'वनवा पेटला क्रांतीचा', 'मारलं लेकरू', ‘कष्टाची शिदोरी’,‘घायाळ पाखरा’ अश्या अनेक नाटकांची मोफत मेजवानी

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :-

संगीत नाटक अकादमी, नवी दिल्ली (संस्कृती मंत्रालय भारत सरकारची रवायत संस्था) व लोकजागृती नाट्य, कला, क्रिडा, सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक संस्था, चंद्रपूर यांच्या विद्यमाणे झाडीपट्टी नाट्य महोत्सव २०१९ चे आयोजन दिनांक ११ डिसेंबर ते १५ डिसेंबर २०१९ पर्यंत सिध्दार्थ स्पोटिंग क्लब, बायपास रोड, बाबुपेठ, चंद्रपूर येथे करण्यात आले असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत संयोजक अनिरुद्ध वनकर यांनी दिली. 


या झाडीपट्टी नाट्य महोत्सवाचे उद्घाटन मा. हंसराजजी अहिर माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार नवी दिल्ली यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी मा. विजयभाऊ वड्डेटीवार माजी मंत्री व माजी विरोधी पक्ष नेता म. रा. मुंबई राहणार आहे तर विशेष अतिथी म्हणून मा. सुमनकुमार उपसचिव संगीत नाटक अकादमी नवी दिल्ली, मा. कुणाल खेमणार जिल्हाधिकारी चंद्रपूर, मा. डॉ. महेश्वार रेड्डी पोलीस अधिक्षक चंद्रपूर, मा. राहूल कर्डिले मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर, मा. संजय काकडे आयुक्त म. न. पा. चंद्रपूर यांची उपस्थीती राहणार आहे.दिनांक ११ डिसेंबर २०१९ बुधवारला सायंकाळी ६ वाजता या नाट्य महोत्सवाच्या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा संप्पन होत असून लगेच झाडीपट्टीतील प्रा. शेखर डोंगरे व के. आत्राराम यांचे ‘भूक’ हे नाटक सादर होणार आहे. 

दिनांक १२ डिसेंबर २०१९ गूरुवारला सायंकाळी ७ वाजता संदेश आनंदे यांचे ‘अंधारलेल्या वाटा’ हे नाटक सादर होणार आहे. दिनांक १३ डिसेंबर २०१९ शकवारला सायंकाळी ७ वाजता हिरालाल पेंटर यांचे ‘कष्टाची शिदोरी’ हे नाटक सादर होणार आहे. दिनांक १४ डिसेंबर २०१९ शनिवारला निर्माता, दिग्दर्शक, सिनेअभिनेता अनिरूध्द वनकर निर्मित जंगल थिएटर द्वारा ‘जागल्या’ या नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे. दिनांक १५ डिसेंबर २०१९ रविवारला सायंकाळी ७ वाजता लेखक, दिग्दर्शक अनिरुध्द वनकर यांचे ‘घायाळ पाखरा’ या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण होणार आहे. 

पाच दिवसीय झाडीपट्टी नाट् महोत्सव चंद्रपूर, कुरुड जिल्हा गडचिरोली, चिखली जिल्हा गोंदिया येथे झाडीपटटी नाटकाची मेजवानी प्रेक्षकांसाठी आयोजकांनी निशुल्क केली आहे.
दिनांक १२ डिसेंबर २०१९ पासुन कुरूड येथे सायंकाळी ७ वाजता भक्षक, जागल्या, फाटका पदर मायेचा, शपथ कुंकवाची हे नाटक होणार असून चिखली जिल्हा गोंदिया येथे सुंदर माझ घर, वनवा पेटला क्रांतीचा, मारलं लेकरू सौभाग्यासाठी हे नाटक सादर होणार आहे.


उकलून पूर्व विदर्भाच्या मातितील झाडीपट्टी रंगभूमीचे महत्व ओडकुनै यांचे आयोजन संगीत नाटक अकादमी नवी दिल्ली (भारत सरकार) हे करीत असून संपूर्ण झाडीपट्टी नाट्य महोत्सवाचे संयोजक अनिरुध्द वनकर असून त्यांच्या मार्गदर्शाना मध्ये युवराज चुनारकर, बंडू वाकडे, हरेद्र रामटेके, मंगेश मेश्राम, शिरीष गोगुलवार, ईश्वर खोब्रागडे, अनिल डोंगरे, लोकेश दुर्गे, विपीन राऊत आणि सुधिर जांभूळकर या नाट्य महोत्सवाच्या यशस्वितेकरिता अथक परिश्रम घेत आहे. या नाट्य महोत्सवामध्ये ज्यांना पुस्तक प्रदर्शनी विविध स्टॉल व विक्री करिता जागेची निशल्क व्यवस्था केली आहे असे संयोजक अनिरूध्द वनकर यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले आहे.