जिल्ह्यात दारूबंदी ! पण पोलिसांना मात्र दारू पिण्याची परवानगी? - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्ह्यात दारूबंदी ! पण पोलिसांना मात्र दारू पिण्याची परवानगी?

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :जिवती: लक्षवेधी 


चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ पासून दारू बंदी शासन दरबारी करण्यात आली असेच चित्र सध्या चंद्रपूर जिल्ह्यात दिसून येत आहेत चंद्रपूर जिल्ह्यातच भरमसाठ अवैध दारू विक्री केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे या दारुबंदी मुळे पोलिसांचे अच्छे दिन आले आहेत मध्ये सेवन करणाऱ्या पोलिसांनची मजा झाली आहे. 

हप्ताखोर पोलिसांनची चांदी झाली आहे असे चित्र सध्या दिसत असुन सध्या जिवती तालुक्यात एका चर्चेला उधाण आले आहे की जिवती तालुक्यातील पिटटीगुडा उप पोलिस स्टेशनच्या एका पोलिस कर्मचाऱ्याची दिनांक २८ नोव्हेंबर २०१९ रोजी मरकागोंदी ते शेणगाव रस्त्यालगत च्या शेतात मध्ये धुंद अवस्थेत असल्याची माहिती मिळाली. 

त्याच वेळी सय्यद शब्बीर जागीरदार सामाजिक कार्यकर्ते यांनी यांनी पिटटीगुडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार यांना फोन करून सांगितले की तुमचा पोलिस कर्मचारी नाव सागर सांगत आहे मध्ये धुंद अवस्थेत असल्याची माहिती दिली तेव्हा ठाणेदार साहेबांनी पोलिस व्हॅन पाठवून त्या मध्ये धुंद अवस्थेत असलेल्या पोलीस कर्मचारी ला घेऊन गेले तरी पण फुकटाची दारू ढोसणाऱ्या  पोलिस कर्मचारीला काही फरक पडला नसुन दुसऱ्या दिवशी दिनांक २९ नोव्हेंबर रोजी शेणगाव येथे सकाळी १० वाजता मध्ये धुंद अवस्थेत आढळून आला. 

हि माहिती पुन्हा ठाणेदार साहेबांना देण्यात आली ठाणेदार साहेबांनी तो कर्मचारी आज कर्तव्यावर गैरहजर असल्याची माहिती  दिली.   याचा अर्थ असा होतो की पोलिस कर्मचारीही अधिकार्यांची ऐकत नाही असे दिसून येत आहे.        

पोलिस कर्मचारी दारू पिऊन गावात  धिंगाणा घालत असणार तर सामान्य माणूस  दारुबंदीची भिती बाळगणार का ? असा  प्रश्न निर्माण झाला आहे या घटनेची जिल्हा पोलिस अधीक्षक साहेब दखल घेतात का? अशी चर्चा सध्या जिवती तालुक्यातील जनता करीत आहे!