खबरकट्टा / चंद्रपूर : चिमूर -
शंकरपूर येथील शिवम मनोहर भानारकर या नवव्या वर्गात शिकणाऱ्या मुलाचा टावर वरुन पडून मृत्यू झाला होता तो म्रुत्यू नसून त्याचा खून करण्यात आला असावा असा आरोप त्यांनी भीसी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शंकरपुर पोलीस चौकी मध्ये दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की शिवम हा येथील नेहरू विद्यालयात नव्या वर्गात शिकत असून पंधरा वर्षाचा आहे हा मुलगा अतिशय शांत स्वभावाचा असून लाजाळू आहे कुणाच्या जास्त संपर्कात नसतानाही माझा मुलगा गावापासून तीन किलोमीटर अंतरावर गेला कसा असा प्रश्न वडिलांनी उपस्थित केला, ज्या ठिकाणी माझ्या मुलाचे प्रेत मिळालं त्याठिकाणी ना माझी शेती आहे ना माझ्या कोणत्या नातेवाईकांचे किंवा संबंधिताची शेत जमीन आहे. त्यामुळे तो परिसर आमच्यासाठी नवीनच आहे अशा नवीन ठिकाणी मुलगा एकटा कसा जाऊ शकतो असा गंभीर प्रश्न वडिलांनी उपस्थित केला आहे.
माझा मुलगा घरी झाड़ावर चढत नाही तर एवढ्या मोठ्या इलेक्ट्रिक टॉवर वर चढू शकत नव्हता कारण त्या टॉवर ला तारेचे कुंपण केलेले आहे. त्यामुळे मुलगा वरती चढला कसा हा सुध्दा मोठा गंभीर प्रश्न त्यांनी तक्रारीत उपस्थित केला आहे. सोबतच वरून पडल्यानंतर खालची शेत जमिनी मुलायम होती तिथे कुठलेही दगडधोंडे नव्हते मग माझ्या मुलांच्या डोक्याला गंभीर मार लागून मृत्यू कसा झाला असावा असाही प्रश्न वडिलांनी उपस्थित केलेला आहे.
भिसी शंकरपूर या मुख्य रस्त्यापासून ज्या ठिकाणी प्रेत मिळालें त्या ठिकाणी जाण्यासाठी साधा योग्य रस्ताही नाही. ना त्याचे सोबत त्याचे मित्र आहेत.मग तो एकटा तिथे गेला कसा? तसेच त्याच्या जीन्स पॅन्टची बटन सुद्धा तुटून होती चप्पल सुद्धा व्यवस्थित टॉवर च्या एका पाया जवळ लावून होती. या सर्व प्रकरणावरून माझ्या मुलाचा हा नैसर्गिक मृत्यू किंवा पडून मृत्यू झाला नसून त्याचा घातपात झाल्याचा संशय वडिलांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याची मागणी वडील मनोहर भानारकर आई सुमित्रा भानारकर भोई समाजाचे नेते प्रकाश नान्हे व गावकऱ्यlनी केली आहे.
याप्रकरणात वडील मनोहर भानारकर यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून तशी तक्रार आमच्याकडे दाखल केलेली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल.-रवींद्र नाईकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक पो.स्टे. भीसी