धानपिकात धाबा धरून बसलेल्या वाघाचा महिलेवर हमला ::वृद्ध महिला गंभीर जखमी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

धानपिकात धाबा धरून बसलेल्या वाघाचा महिलेवर हमला ::वृद्ध महिला गंभीर जखमी

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : मूल प्रतिनिधी -



तालुक्यातील कांतापेठ गाव शिवारातील शेतात काम करीत असताना धान पिकात धाबा धरून बसलेल्या वाघाने निवृताबाई सुधाकर मोहुर्ले  (वय -60 वर्ष)  यांच्यावर हमला चढवित जखमी केले.

यात निवृताबाई मोहुर्ले गंभीर जखमी झाल्या  असून डाव्या डोळ्याला व पाठीवर जखमा झाल्या आहेत. शेतात धान पिकाची कापणी आणि बांधणी सुरू असल्याने शेतात काम करणारे शेतकरी शेतमजूर यांच्या मुळे सदर महिलेचे प्राण वाचले आहे.

परिसरात वाघाची दहशत निर्माण झाला आहे, संपूर्ण परिसरातील गावातील शेतकरी शेतमजूर यांना  शेतात काम करीत असताना जीव मुठीत ठेऊन काम करावे लागत आहे. वनविभागाने वाघांचा तत्काळ बंधोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.