भद्रावतीत सख्ख्या भावाने केला बहिणीवर अत्याचार : बहीण भावाच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या घटनेचा सर्वच स्तरातून तीव्र संताप - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

भद्रावतीत सख्ख्या भावाने केला बहिणीवर अत्याचार : बहीण भावाच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या घटनेचा सर्वच स्तरातून तीव्र संताप

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : भद्रावती -

भद्रावती शहरात बहीण भावाच्या पवित्र  नात्याला काळिमा लावनारी  घटना घडली असून सख्या भावाने केला बहिणीवर अत्याचार केल्याची तक्रार पीडितेने पोलीस ठाण्यात करण्यात आली असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
भद्रावतीत सख्ख्या भावाने बहिणीवर अत्याचार केल्याच्या घटनेने शहरात खडबड उडाली आहे. तालुक्यातील गौराळा येथील आशिष झाडें(28) या आरोपीने आपल्याच विवाहित बहिणीवर घरी कुणीच नसल्याचा फायदा घेत अत्याचार केला. पीडिता ही विवाहित असून काही कारणास्तव माहेरी आली होती.आरोपी हा अविवाहित असून 2017पासूनच आपल्या बहिणीची छेडखानी करीत होता  दरम्यानया वेळेस ती माहेरी आल्यावर आई-वडील बाहेर गेल्याच्या संधीचा फायदा घेत त्याने हे कृत्य केले. 
ही घटना घडल्यावर पीडितेने  थेट पोलीस ठाणे गाठून आपली आपबिती कथन केल्यावर आरोपी विरुद्ध कलम 376(2-अ ),  506 अन्वये तक्रार दाखल करून आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे. 

हैद्राबाद येथे घडलेल्या प्रकरणाचा संपूर्ण देशभरातून तीव्र निषेध होत असतानाच भद्रावतीत घडलेल्या या घटनेमुळे  आपल्याच घरात मुली सुरक्षित नसल्याचे चिंतनीय आहे.