खबरकट्टा / देश : थोडक्यात -
झारखंडमध्ये बलात्कार आणि हत्येप्रकरणी एका नराधमाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या नराधमाचं नाव राहुल रॉय असे आहे. झारखंडमधील रांचीमध्ये राहुल रॉयने 15 आणि 16 डिसेंबर 2016 ला इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर बलात्कार करुन तिला जिवंत जाळले होते.
या प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज निकाल दिला.देशात महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून अत्याचार करणाऱ्या सर्व नरधामांना तात्काळ फाशी देण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात विविध स्तरातून होत आहे.