सिंदेवाही वनविकास महामंडळ वन परिक्षेत्र पाथरी अंतर्गत येत असलेल्या कन्हाळगांव येथील वनविकास महामंडळातील बिटात दुपारी 3:30 ते 4 चे दरम्यान प्रभुदास कान्हूजी मसराम रा.कन्हाळगाव यांच्या वर पट्टेदार वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले आहे.
जखमी इसमाच्या पाठीवर,छातीवर व डाव्या हातावर गंभीर जख्मी केले आहे.हि माहिती वनविभागाला कळताच वनविकास महामंडळ पाथरीचे अधिकारी व वनपरिक्षेत्र वनविभाग सिंदेवाहीचे अधिकारी यांनी मोक्का स्थळावरुन त्या इसमाला प्राथमिक स्वास्थ केंद्र गुंजेवाही येथील दवाखान्यात प्राथमिक इलाज करून जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे पाठविण्यात आले आहे.पुढील तपास वनविकास महामंडळ परिक्षेत्र पाथरी हे करीत आहेत.