दुचाकीच्या धडकेत पदाचाऱ्याचा जागीच मृत्यू : दुचाकी चालक पसार - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

दुचाकीच्या धडकेत पदाचाऱ्याचा जागीच मृत्यू : दुचाकी चालक पसार

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रम्हपुरी-

ब्रम्हपुरी शहरात नुकत्याच झालेल्या दुचाकीने दिलेल्या धडकेत एका पादचारीचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घडली आहे.

 मृतक इसमाच नाव  तुळशीदास ठाकरे वय वर्ष अंदाजे ४० असून ब्रम्हपुरी शहराला लागूनच असलेल्या खेडमक्ता गावातील आहे.

सदर घटना ही कांबळे राईस मिल ब्रम्हपुरी जवळ नुकतीच घडली असून मृत इसम तुळशीदास हा  रस्त्याच्या बाजूला चालत जात असताना अचानक भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीने जब्बर धडक दिली त्यात तुळशीदासचा जागीच मृत्यू झाला.
      
धडक देणारा दुचाकीचालक सुद्धा खाली पडला.त्याला मार कमी लागल्याने घटनास्थळावरून उठला आणि दुचाकी पकडून पसार झाला.मात्र दुचाकीचालक खाली पडल्याने काही कागदपत्रे व मोबाईल घटनास्थळी मिळाला आहे.

मृतक तुळशीदास हा घरी एकटाच होता. दुसऱ्याच्या इथे मिळेल ते काम करून पोटाची खळगी भरून जीवन कसेबसे जगत होता.

मृतक तुळशीदासच्या जाण्याने गावपरिसरात शोककळा पसरली आहे.तरी सदर घटनेचा पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी करीत आहेत.