खबरकट्टा / चिमूर- प्रतिनिधी ( जावेद पठाण)-
दिनांक 15 डिसेंबर 2019 रोज रविवारला राष्ट्रीय मानवाधिकार एवं सामाजिक न्याय संगठन चिमूर यांचे तर्फे चिमूर तालुक्यातील ताडोबा अंधेरी व्याघ्रप्रकल्प कोलारा गेट मार्गावरील पुरातन व प्राचीन कालीन वास्तू म्हणून प्रसिद्ध असलेली पायऱ्याच्या विहीरीच्या अवती-भोवतीच्या परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
जेणेकरून तोडोबा अंधेरी व्याघ्रप्रकल्प पाहणी करणेसाठी देश-विदेशातील येणाऱ्या पर्यटकांना त्या वास्तू जवळ अस्वच्छता दिसू नये व त्यांना ते वास्तू पाहण्यास जातांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून या गोष्टीची दखल शासनाने व त्यांनी नेमलेल्या ताडोबा प्रकल्प कमिटीने न घेतल्यामुळे स्वतः मानवाधिकार स्वयंसेवकांनी या गोष्टीची दखल घेऊन त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली व त्या प्राचीन कालीन वास्तूच्या अवती-भोवती असलेला परिसर स्वच्छमय करून त्याची शोभा वाढविली.
मानवाधिकार संगठना सेवाभावी कार्य नियमितपणे करीत असते अश्याप्रकारे नेहमीच त्यासाठी समाजातील जनतेनी पण त्यांचे खूप अभिनंदन करून प्रोत्साहित केले आहे.
शासनाने अश्या प्राचीन कालीन शेकडो-हजारो वर्षापूर्वीच्या वास्तू जपुन ठेवणेसाठी त्यांचेवर देखरेख करणाऱ्या समित्यांना सूचना करून त्यांची जोपासना करायला पाहिजे असे विनंतीपूर्वक तोंडी निवेदनातून श्री.प्रशांतभाऊ डवले ता. उपाध्यक्ष, मानवाधिकार एवं समाजिक न्याय संगठन चिमूर यांनी आपले मत व्यक्त केले.
या स्वच्छता मोहीममध्ये श्री.सचिनजी गेडाम अध्यक्ष, मानवाधिकार एवं सामाजिक न्याय संगठन चिमूर, श्री.प्रशांतभाऊ डवले उपाध्यक्ष, श्री.हितेशजी सिडाम कोषाध्यक्ष, श्री.प्रेमदासजी वासनिक संगठक, श्री.गणेशजी संगेल ग्रा.संगठक, श्री.अमितजी मेश्राम सदस्य, श्री.मंगेशजी रंदई सदस्य, श्री.जगदीशजी गौरकार सदस्य,, सौ.लीनाताई उरकुडे सदस्य, , सौ. रोहिनीताई गौरकार सदस्य, सौ.वंदनाताई गेडाम सदस्य, सौ. हेमलताताई जांभुळकर सदस्य, सौ. यशोदाताई गायकवाड, सदस्य, येथील स्वयंसेवक तथा सदस्य उपस्थित होते. आणि सर्व परिसर स्वच्छ करून स्वच्छतेचा संदेश व मूलमंत्र देत स्वच्छता मोहिम आटोपण्यात आली.