: भिसी शहरात नळाच्या दूषित पाण्यामध्ये जंतु: ग्राम पंचाय,सरपंच व ग्रामविस्तार अधिकारी यास जबाबदार - भावराव ठोंबरे, माजी शिवसेना तालुका प्रमुख
चिमूर - प्रतिनिधी ( जावेद पठाण )
या ग्राम पंचायत मध्ये महीला सरपंच असुन , महीला तक्रार करायला भित होत्या.मांगील काही दिवसा अगोदर सरपंच बाई ने महिलांवर गुन्हे दाखल केले. म्हणून महीला मध्ये भितीचे वातावरन आहे.
भिसी शहरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात असून फार मोठा धोका होण्याची शक्यता आहे. पाणी पुरवठ्यावर देखरेख ही ग्रामपंचाय करीत असते.परंतु ग्रामपंचाय ची देखरेख ही सरपंच ,ग्राम पंचायत सदस्य, व सचिवाची जवाबदारी असते. हि जवाबदारी हाताळायला जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
ग्राम विस्तार अधिकारी अनुरुध शेंडे हे चंद्रपुर वरुन येत असल्यामुळे पाणी पुरवठा कर्मचाऱ्यावर व ग्रामपंचायत कडे दुर्लक्ष होत आहे.भिसी येथे जनतेच्या आरोग्याशी हा खेळ सुरू असून यास जवाबदार ग्रामपंचायत,सरपंच व सचिव असेलअसे भावराव ठोंबरे माजी शिवसेना तालूका प्रमुख यांचा आरोप आहे.