राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिना निमित्य राष्ट्रीय हरित सेने तर्फे सायकल रॅली द्वारे शहरात पोहोचविले विविध सामाजिक संदेश - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिना निमित्य राष्ट्रीय हरित सेने तर्फे सायकल रॅली द्वारे शहरात पोहोचविले विविध सामाजिक संदेश

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :राजुरा -2 डिसेंबरबालवीद्या शिक्षण प्रसारक मंडळ ,राजुरा द्वारा संचालित आदर्श हायस्कूल च्या राष्ट्रीय हरित सेना विभागाच्या विध्यार्थीनी विभाग प्रमुख बादल बेले यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दीना नीमीत्य सायकल रॅली  चे आयोजन करण्यात आले होते.
              

या सायकल रॅलीला आदर्श प्राथमिक च्या मुख्याध्यापीका नलीनी पिंगे व जेष्ठ शिक्षिका ज्योती कल्लूरवार ,हायस्कूल चे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर यांनी हिरवा ध्वज उंचाउन सुरुवात केली.


यावेळी सहभागी सर्व विद्यार्थीनी लाल रंगाची रीबीन हातावर बांधून एड्स जनजागृती चा संदेश दिला.शहरातील मुख्य बाजारपेठ मार्गांनी या  रॅलीने प्रदीक्षणा केली.

औद्योगिक तसेच वैयक्तिक पातळीवरील प्रदुषणाने अनेक ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडली आहे.याचा विपरीत परिणाम माणसानंबरोबर इतर जीवसृष्टी ,नैसर्गिक संसाधने आणि हवामानावरही होत आहे.प्रदूषनाच्या दुष्परिणामाबाबत सर्वसामान्यांमधे जाकरूता वाढली पाहिजे याची गरज आता जगभरात निर्माण झालेली आहे.
 • 2 डिसेंबर 1984 च्या रात्री भोपाळजवळील यूनियन कार्बाइडच्या कारखान्यातून विषारी वायुची गळती होऊन हजारो लोक मृत्यू मुखी पडले.या दुर्घटनेची आठवण विशेषता औद्योगिक क्षेत्राला रहावी आणि यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी ,म्हणून हा दिवस भारतात पाडला जातो.
                    


या दिवसाचे औचित्य साधून आपण काय करू शकतो याविषयी सविस्तरपणे माहिती राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले यांनी दिली.  रॅलीच्या यशस्वीते करीता इयत्ता आठवी चे वर्गशिक्षक संतोष वडस्कर ,स्कॉऊट यूनिट लिडर रुपेश चीडे, गाईड यूनिट लिडर सुनीता कोरडे ,शिक्षिका भाग्यश्री क्षीरसागर यांच्यासह सर्व शिक्षक -शिक्षिका यांनी अथक परिश्रम घेतले.यावेळी विद्यार्थीनी सायकल ऱ्यली मधून विविध संदेश दिले व राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दीनाबद्दल जनजागृती केली.