शेतकरी सम्मान योजनेच्या निधीसाठी शेतकरी धडकले तहसील कार्यलयावर - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शेतकरी सम्मान योजनेच्या निधीसाठी शेतकरी धडकले तहसील कार्यलयावर

Share This
-मंगेश पाचभाई यांच्य नैतृत्वात झरी जामनी तहसीलवर धडकला शेतकऱ्यांचा मोर्चा खबरकट्टा / यवतमाळ : गणेश पेटकर 

"शेतकरी जगला तर जग जगेल" ही व्याख्या जगात प्रसिद्ध आहे मात्र झरी जामनी तालुक्यामध्ये असे चित्र दिसून येत नाही.पंतप्रधान किसान सम्मान योजना यांचे पैसे आजवरची बँक खात्यात जमा नाही ,शेतकरी राजा आपले शेतातले काम सोडून पटवारी यांच्याकडे वारंवार फेऱ्या मारून त्रस्त झाला असून,पटवाऱ्याला आधार कार्ड,बँक पुस्तक कित्येक वेळा दिले असता त्यांच्या हलगर्जी पणामुळे शेतकऱ्यांच्या  खात्यात अजूनही पैसे आले नाही.प्रशासनाच्या व पटवाऱ्याच्या अश्या हलगर्जीपणामुळे अडेगाव येथील समस्त शेतकरी पैकी यांच्या खात्यात अजूनही एक रुपया जमा नाही झाला.या मध्ये पटवाऱ्यांने 'डाटा एन्ट्री' केली नसून त्यांच्या या सर्व हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन होत आहे, अश्यातच सर्व गावकाराच्या सहमतीने  हलगर्जी पटवारी यांची बदली करून शेतकऱ्याचे कामे करण्यासाठी कर्तव्यदक्ष अधिकारी देण्यात यावे ही मागणी सर्व गावकरी यांनी केली.करून आज दि 17 डिसेंबर रोजी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा  मंगेश पाचभाई यांच्या नैतृत्वात पार पडला.
या  वेळी गावातील शेतकरी अरुण पानघाटे,सुधाकर लालसरे,धनंजय पाचभाई,सुनील लांडगे,श्रीराम पावडे,केशव मांढरे,विमल टेकाम,सुनील पाचभाई,लक्षण केलझलकर,मारोती भोयर,गुलाब आत्राम,योगेश बेलेकर,उद्धव मांढरे,युवा समाजसेवा ग्रुप चे विजय लालसरे,संतोष पारखी,गणेश पेटकर,विलास देठे,राहुल ठाकूर,प्रणल गोंडे,महेंद्र पाल,खुशाल पारखी,विकास पारखी,राकेश किंनेकर,रवीद्र चिंचुलकर,विजय भोयर,देवानंद पाचभाई,दत्ता लालसरे,दिनेश गेडाम,सुरज पेटकर,दिनेश जीवतोडे,सुरज डहाके,संदीप झाडे,सुरज मशिरकर,योगेश बेलेकर,गणेश बुरडकर,गिरीधर राऊत,गजानन हुलके,शंकर पत्रकार,दिगंबर पाचभाई,प्रदीप पेटकर  उपस्थित होते.