अवैधरित्या रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर वनाधिकार्‍यांनी केले जप्त - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अवैधरित्या रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर वनाधिकार्‍यांनी केले जप्त

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :चिमूर-प्रतिनिधी ( जावेद पठाण )


 वनविकास विभागा च्या विशेष पथकाने दिनांक 14 डिसेंबर 2019 रोजी रात्री दोन वाजता वनविकास महामंडळाच्या राखी वन क्षेत्रातून अवैधरीत्या रेती वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळताच भिसी परिमंडळ क्षेत्रातील कक्ष क्रमांक १७ मध्ये ट्रॅक्टर क्रमांक एम एच ३४ _ ८८६४ ट्रॉली सह अवैधरित्या रेती वाहतूक करत असताना वाहन मालक आरोपी रंगनाथ रामभाऊ चौधरी उर्फ ( रंगा) राहणार भिसी याला अटक करून वन अधिकाऱ्यांनी ट्रॅक्टर जप्त केले.


सदरची कार्यवाही खडसंगी परिक्षेत्रातील वन परिमंडळ अधिकारी श्री आर.पी .बलैया तसेच भिसी चे क्षेत्र सहाय्यक ए.जी .बायस्कर, श्री आर.पी .अगोसे वनरक्षक, श्री के बी चव्हाण वनरक्षक तसेच श्री वाय .डी. गोटे वनमजूर इतर अधिकाऱ्यांनी कारवाई केली.


पुढील तपासाकरिता ट्रॅक्टर मालक व जप्त केलेले ट्रॅक्टर चिमूर येथील तहसील कार्यालयला  सुपृत करून पुढील वनगुन्हे कामातील तपास पश्चिम चांदा वन प्रकल्प विभागाचे विभागीय वनाधिकारी श्री मोरे  तसेच सहाय्यक व्यवस्थापक सुनील आत्राम  वनपरिक्षेत्राधिकारी ऋतुराज बारटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय वनाधिकारी करत आहेत वनविकास महामंडळाच्या विशेष पथकाची ही सलग तिसरी कार्यवाही असल्याने अवैद्यरेती वाहतूक करणाऱ्या मध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.