आदित्य आवारी यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी निवड - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आदित्य आवारी यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी निवड

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


राजुरा येथील युवा कवी आदित्य दिनकर आवारी यांना उस्मानाबादेत होणाऱ्या आगामी ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०२० येथे कविता सादर करण्यासाठी मान मिळालेला आहे.१०,११ व १२ जानेवारी २०२० ला आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कविकट्टा या काव्यमंचावर कविता सादर करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

आदित्य यांच्या "खाणीतला बाप" या कवितेच्या सादरीकरणासाठी निवड झाली आहे,या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे असून स्वागताध्यक्ष नितीन तावडे हे आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील जेष्ठ कवींच्या रांगेत आदित्यने स्थान मिळवले आहे, आदित्यचे वय अवघे १७ असल्याने मित्रपरिवार,राजुरा क्षेत्रात आणि महाविद्यालयात आदित्यचे कौतुक केले जात आहे.टीम खबरकट्टा कडून युवकवी आदित्य आवारी यांचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐