बिग ब्रेकिंग न्यूज : राजुरा विधानसभेत येत्या काही महिन्यांत पुनः निवडणूक ? - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बिग ब्रेकिंग न्यूज : राजुरा विधानसभेत येत्या काही महिन्यांत पुनः निवडणूक ?

Share This


खबरकट्टा / चंद्रपूर :"महाराष्ट्र विधानसभा 2019" निवडणूक राज्यात गेल्या ऑक्टोबर महिन्यात पार पडली असून, अनेक वाटाघाटींनंतर महाविकास आघाडीचे सरकार सुद्धा स्थापन झाले आहे.

परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा -70 ह्या निर्वाचन क्षेत्रात काही अपक्ष उमेदवार आपला पराजय मान्य करण्यास तयार नसून, त्यांनी विजयी उमेदवारांविरुद्ध अतिशय चाणक्य खेळी खेळत पुनः फेरनिवडणूक घडवून आणण्याचा राजकीय डाव मांडला असून लवकरच या विधानसभेत मतदारांना पुनः मतदानाची संधी मिळवून देण्याची पूर्ण तयारी त्यांनी केली आहे. 

नवीन  येणाऱ्या 2020 वर्षाच्या प्रारंभीच खूप मोठा राजकीय स्फोट घडवून  आणून राजकीय पटलावर पूर्ण विजय मिळविण्याचा प्रयत्न पराजयानंतरही आपला प्रचार एकही दिवस न थांबता सुरूच ठेवणाऱ्या या उमेदवारांचा असून येत्या महिन्यात घडणाऱ्या प्रशासकीय घटनांकडे लक्ष वेधले आहे.

टीप : ही बातमी कोणत्याही व्यक्तिगत किंवा सूत्रांच्या आधारे नसून प्रशासकीय व भारतीय न्यायव्यवस्था प्रक्रियेतील  घडामोडींच्या आधारवर आहे. या संदर्भांत संपूर्ण सविस्तर माहिती लवकरच फक्त खबरकट्टा वर... !