टॉवरच्या बॅटऱ्या चोरणारे गजाआड - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

टॉवरच्या बॅटऱ्या चोरणारे गजाआड

Share This
खबरकट्टा / यवतमाळ : 

मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या पळविनाऱ्या चोरट्यांना गजाआड टाकण्यात पोलीस प्रशासनाला यश मिळाले आहे.चोरट्यां कडून लाखोंच्या बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या.


मागील काही महिण्यांमध्ये यवतमाळ जिल्हा परिसरात मोबाईल टावरच्या बॅटऱ्या चोरीच्या घटना वाढल्या होत्या, त्यामुळे पथक स्थापन करून शोध सुरू केला असता पथकास आरोपी उमेश मडावी रा. वणी हा चोरीच्या मोबाईल टावर बॅटऱ्या घेवून त्याचेदोन साथीदारासह चंद्रपुर येथे विक्री करीता फोर्स ट्रॅव्हलर या चारचाकी वाहनाने जाणार आहे, अशा खात्रीलायक माहिती वरुन पो.स्टे. शिरपूर हद्दीतील चारगाव चौकी येथे सापळा रचुन प्राप्त माहिती प्रमाणे चार चाकी वाहनाचे प्रतिक्षेत असतांना सकाळ सुमारास माहिती प्रमाणे फोर्स ट्रव्हलर हे चार चाकीवाहन चंद्रपुरकडे जातांना दिसुन आल्याने पो. स्टाफचे मदतीने त्यास थांबवुन वाहन चालक व त्यातील दोन ईसमांकडे चौकशीकरुन झडती घेतली. 

सदर वाहनामध्ये एकुण १२ नग मोबाईलटावरच्या  बॅटऱ्या किमंत अंदाजे ६० हजाररुपयेच्या मिळुन आल्याने नमुद ईसम उमेश उत्तम मडावी रा. खरबडा मोहल्ला वणी,शिवा पांडुरंग गुरनुले रा.चिखलगांव वणी,मारोती केशव मांदाडे रा. चिखलगांव वणीयांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे कसुन चौकशी केली असता त्यांनी सदरच्या बॅटऱ्या ह्यापो.स्टे. वडकी आणि घाटंजी, पारवा,मुकुटबण, पाटण, वणी ह्या परिसरातुन सातते आठ महिण्यांपासुन चोरल्याचे सांगीतले.काही बॅटऱ्या सलमान खान ऑमरोहीन खान, मोहंमद आदील खान मोमीन खान दोन्ही रा. मेरठ उत्तर प्रदेश, ह.मु. अंचलेश्वरगेट, चंद्रपुर यांना विक्री केली असल्याचे सांगीतले. त्यावरुन पथकासह चंद्रपुर येथे जावुन नमुद दोन्ही ईसमांचे घर झडती मधुन एकुण ३५ नग चोरीच्या मोबाईल टावर बॅटऱ्या कि.अं.१ लाख ७५ हजारच्या मिळुन आल्याने जप्त करण्यात आल्या.

आरोपी क्रमांक १ ते ३ यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांचा साथीदार अभय सुधाकर पचारे रा. वणी हा सुध्दा चोरी मध्ये सामील असल्याचे सांगीतले त्यावरुन त्याची घरझडती घेतली असता चोरीची मोबाईल टावर बॅटरीची मिळुन आल्याने जप्त करण्यात आली.