कृषी उत्पन्न बाजार समिती , चिमूर महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्या यांच्या सौजन्याने चिमूर कॉटन इंडस्ट्री येथे कापूस खरेदी शुभारंभ - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कृषी उत्पन्न बाजार समिती , चिमूर महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्या यांच्या सौजन्याने चिमूर कॉटन इंडस्ट्री येथे कापूस खरेदी शुभारंभ

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :चिमूर - प्रतिनिधी ( जावेद पठाण )


चिमूर दिनांक.०३/१२/२०१९ कृषी उत्पन्न बाजार समिती , चिमूर महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्या यांच्या सौजन्याने चिमूर कॉटन इंडस्ट्री येथे कापूस खरेदीचे शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाले.


यावेळी शेतकऱ्यांना एक संदेश देण्यात आला कि शेतकऱ्यांनी पैशांच्या लालसेने कापसमध्ये पाणी न मिसळविता कापूस जिनिंग ला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून विक्री करावी जेणेकरून ८ ते १२ इतकाच कापुस ओलसर असला तरी चालेल त्यावर नाही.  


सन २०१९ व २०२० या वर्षाचा अधावत कापूस पेरा नोंद अवस्थेत सातबारा असायला हवा , बँक पासबुक ची झेरॉक्स , आधार कार्डची झेरॉक्स , कापसामध्ये कोणत्याही प्रकारचा काडी कचरा नसावा अन्यथा कापूस माल स्विकारण्यात येणार नाही अशा अटी सुद्धा शेतकऱ्यांसमोर मांडन्यात आल्या. 

यावेळी नरेंद्रजी ठाकरे संचालक म.रा. सरकारी कापूस उत्पादक समिती पणन महासंघ कॉटन फेडरेशन , आटे सर ( झोनल मॅनेजर) , मादने सर ( ग्रेडर ) कृषी उत्पन्न बाजार समिती चिमूरचे सभापती माधवजी बिरजे , सचिव घनशामजी ढोणे , चिमूर कॉटन इंडस्ट्री चे अनिल मेहर , प्रमोद भलमे , राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष मंगेशजी बारापत्रे तसेच आदींची यावेळी उपस्थिती होती.