खबरकट्टा / चंद्रपूर :
तुकुम परिसरात असलेल्या एका लॉनचे बांधकाम पाडतांना मनपाच्या अतिक्रमण विरोधीपथकाने घर मालकाला परवानगी नसलेले बांधकाम मोडण्यास सांगीतले होते.
दरम्यान घर मालकाने रितसर परवानगी साठी अर्ज करीत मनपा आयुक्तांकडे विनंती करीत असतांनाच मनपाच्या झोन क्रमांक १ चे उपायुक्तांनी अतिक्रमण विरोधी पथका सोबत जावून जे बांधकाम पाडायचे होते ते न पाडता दुसरेच घराचे बांधकाम पाडले. यामुळे घर मालकाचे जवळपास २५ लाख रूपयाचे नुकसान झाले आहे.
हा प्रकार तुकुम येथील माणिक भाऊराव लोणकर यांच्या घरा बाबत घडला आहे.माणिक लोणकर यांचे तुकूम येथे एक लॉन आहे. या लॉन मधील परवानगी नसलेले बांधकाम काढण्या संदर्भात याआधी मनपाकडून नोटीस देण्यात आली होती मात्र दि.२४ डिसेंबरला प्रत्यक्षात भलतेच बांधकाम पाडण्यात आल्याचा आरोप माणिक लोणकर यांनी केला आहे.घरातील सोफासेट, पंखे,हॅलोजन, मोटार्स, स्टाईल्सचे अतोनात नुकसान झाले.