पोरींनो पूर्ण कपडे घाला, कुटुंबाचा आधार बनण्यास मदत करा : बायकोच्या आधारामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या निश्चितच कमी होतील-सिंधुताई सपकाळ - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

पोरींनो पूर्ण कपडे घाला, कुटुंबाचा आधार बनण्यास मदत करा : बायकोच्या आधारामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या निश्चितच कमी होतील-सिंधुताई सपकाळ

Share This
गरिबी फार वाईट असते; पण मरायचं नाही. आपल्याला जगायचं आहे.बाईला घडविताना देवाने नकीच ओढाताण केली असेल. यामुळे नवऱ्याला आधार द्या. बायकोच्या आधारामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या निश्चितच कमी होतील, असा आशावाद सिंधूताई सपकाळ यांनी व्यक्त केला.

खबरकट्टा / गडचिरोली -

तुम्ही कसे दिसता, हे महत्त्वाचे नाही. मात्र वाईटसाईट काही घातले तर माणसाची नजर बदलते. यामुळे तुमच्याकडे बघताना मादी वाटायला नको तर माय आठवायला हवी.यासाठी पोरींनो, अंगभर कपडे घाला; असा सल्ला ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळयांनी दिला.गडचिरोली येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.


सिंधुताई म्हणाल्या, तुम्ही जगाचे शिकू नका. जगाने तुमचे शिकले पाहिजे, असे वागा. मी २२देशांत जाऊन आले. ज्या देशात गेले, त्या देशात महाराष्ट्राचे काही व्यक्ती भेटतात. ते म्हणतात,जय महाराष्ट्र, आमची नऊवारी श्रेष्ठ याचा मला अभिमान वाटतो.मी विदर्भाची कन्या आहे. विदर्भ लहान  नाही. गोपाल कृष्णाला पोरींची कमी नव्हती; पण त्यांनी विदर्भाच्या रुक्मिणीला पळवले!

फुलांच्या पायघड्या वर चालताना काटे बोचले तरी सहन करा. कारण काट्यांना फक्त बोच माहीत आहे, वेदना कळत नसतात. भविष्याकडे जा; पण भूतकावसरू नका, जग खूप बदलले, मुली बाबत काळजी वाटते. पोरींनो, आईची माया जोपासा आयुष्यात जगली तर प्रीत, संपले तर  प्रेत असते. विदर्भ ही गरुडाची खान आहे त्यामुळे उडायला शिका असेही त्या काल गडचिरोली एका कार्यक्रमादरम्यान बोलत होत्या.