चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुका हा अनेक अवैध धंद्यांचे माहेरघर बनत चालला असून तेलंगणा सीमेवर असल्याने, सोईस्कर फायदा घेत बाहेरून आलेले काही व्यापारी व लालसेपोटी जुने मात्तबर सुद्धा अनेक अवैध व्यवसायात गुरफटल्याचे व स्थानिक प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचे मागील काही काळात उघड झालेल्या घटनांवरून लक्षात येते.
खबरकट्टा / चंद्रपूर : गोंडपिपरी शहर प्रतिनिधी -
जून महिन्यात राजुरा-तेलंगणा सीमेवर लक्कडकोट येथे चोर बीटी ची मालवाहतूक कृषी विभागाने उघडकीस आणल्यावर, या मालाचा संबंध गोंडपिपरी येथील बड्या व्यवसायिकांसोबत असून कृषी विभागाने अनेक पाठपुरावा केल्यावरही प्रकरण सत्ताकारन्यांचा वापर करून थंड करण्यात आल्याची चर्चा होती. त्यानंतरही गोंडपिपरी तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी छापे पडल्यावर मोठ्या प्रमाणात चोर बीटी चा माल गोंडपिपरी पोलिसांनी जप्त केला होता. खतांच्या साठ्याचे प्रकरण असेच मार्गी लावण्यात आले.
तालुक्यातील अनेक राजकीय व्यावसायिक च अवैध रेती चे उत्खनन व वाहतूक करीत असल्याची चर्चा शहरात असते परंतु रात्रभर मुशाफिरी करून मात्तबर रेती सप्लायर बनलेल्या या मंडळींविरुद्ध कोणताही महसूल अधिकाऱ्याला फिरकून बघायला वेळ मिळत नाहीये.
तालुका मुख्यालयापासून आक्सपूर येथे मोठ्या प्रमाणात मुरूम उत्खननाबाबत अनेक तक्रारी उपविभागीय अधिकाऱ्यांकडून बघ्याची भूमिका घेत या अवैध व्यासायिकांच्या मुसक्या आवळण्याची तयारी दाखविली नाही.
गेल्या पांढवाड्यातच एका बड्या व्यापाऱ्याकडून मोठ्या प्रमाणात गूळ व तुरटी जप्त करण्यात आल्यानंतर आता पुन्हा अवैध सुगंधित तंबाखू जप्ती करण्यात आली व ती स्थानिक तालुका प्रशासनाला बाजूला सारत लगतच्या मूल तालुक्यातील पोलिसांनी धाड टाकण्याचे धाडस केल्याने गोंडपिपरीच्या संपूर्ण शासकीय प्रशासनाच्या भूमिकेबद्दल संशयास्पद तालुक्यातील नागरिक संशयास्पद नजरेने बघत आहेत.
वाचा : मूल पोलिसांनी गोंडपिपरीत केलेली सुगंधित तंबाखू जप्ती
गोंडपिपरी तालुका हा सुगंधित तंबाखूच्या व्यवसायाचे मुख्य केंद्र ठरले आहे. तंबाखूची आंतरराज्यात याच तालुक्यातून तस्करी होत असतांना येथे अनेक व्यावसायिक तयार झाले आहेत. अशातच गोंडपिपरी शहरात आ दुपारी एक वाजता दरम्यान मूल येथील पोलिसांनी गोंडपिपरी येथील एका व्यावसायिकाच्या गोदामावर धाड टाकून सुगंधित तंबाखूचा माल जप्त केला.सदर कार्यवाहिमुळे व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
महाराष्ट्र-तेलंगाना सीमेवरील गोंडपिपरी तालुक्यात सुगंधित तंबाखुचे अनेक व्यावसायिक कार्यरत आहेत.सीमेवरून दिवसाढवळ्या तंबाखाची तस्करी सुरू आहे. याचबरोबर चंद्रपूर व बल्लारपूर येथून मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखूची आयात तालुक्यात होत आहे. यामाध्यमातून येथील व्यावसायिकाकडे तंबाखूचा माल गोळा करून त्याची विक्री ते किरकोळ व्यापारी व दुकानदारांना करीत असल्याची माहिती आहे.
सदर प्रकार गोंडपिपरी तालुक्यात सर्रास सुरू असतानाच आज अचानक शहरातील एका सुगंधित तंबाखूच्या गोदामवर मूल पोलिसांनी धाड टाकली.मूल पोलिसांच्या एसडीपीओ पथकांनी ही कार्यवाही केली.सदर कार्यवाहीमुळे सुगंधित तंबाखूच्या व्यावसायिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
तालुक्यात दहसत पसरली असून अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. गोंडपीपरी शहरातील सचिन चिंतावार यांच्या दुकानाचे गोदाम ओम किराणा दुकानाच्या मागे आहे.चिंतावार यांचे दुकान शहरातील मुख्य मार्गावर असून त्यांच्या गोदामात चुंगड्या भरलेल्या सुगंधित तंबाखूचा माल पोलिसांनी हस्तगत केला.पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार हा माल १ लाख ३० हजार रुपयांचा आहे.
मात्र पडताळणीनंतर यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता ठाणेदारानी वर्तविली.सुगंधित तंबाखूचा साठा स्थानिक पोलिसांकडे ठेवला आहे.कार्यवाहीदरम्यान स्वतः सचिन चिंतावार,गोंडपिपरीचे ठाणेदार संदीप ढोबे व स्थानिक पोलिस उपस्थित होते. गोंडपिपरी पोलिसांच्या सहकार्यातून एसडीपीओ पथकाने घटनेचा पंचनामा करून माल जप्त केला.
पोलिसांकडून झालेल्या या कार्यवाहीचा अहवाल चंद्रपूर येथील अन्न व औषध प्रशासनाकडे सादर करण्यात आला असून गिरीश सातकर गोंडपिपरीत दाखल झाले.त्यांच्या मार्फतीने प्रकरणाचा तपास सुरू होता.दरम्यान चौकशीत व्यत्यय नको म्हणून सातकर यांनी पत्रकारांना मुद्देमालाची माहिती देण्यास नकार दिल्याने अनेक शंका कुशंकाना फुटले पेव आहेत.