अंतरगाव येथे कर्जबाजारी शेतक-याची किटकनाशक प्राशन करून आत्महत्या - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अंतरगाव येथे कर्जबाजारी शेतक-याची किटकनाशक प्राशन करून आत्महत्या

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -


                   
   
राजुरा तालुक्यातील अंतरगाव ( अन्नुर ) येथे दिनांक २ डिसेंबरला रात्री आठ वाजता विलास उध्दव   चौधरी, वय ४५ या शेतक-याने नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून किटकनाशक पिऊन आत्महत्या केली. यामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
   
रात्री आठ वाजता आपल्याच घरी  किटकनाशक पिल्याचे लक्षात येताच गावक-यांनी उध्दव चौधरी याला राजुरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतू रात्री ११ वाजता त्यांचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. मंगळवारला दुपारी प्रेताच्या उत्तरिय तपासणीनंतर अंतरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या शेतक-याचे नावावर सामायिक मालकीची ३.६९ हेक्टर जमिन अाहे. नापिकी झाल्याच्या व कर्ज फेडण्याच्या चिंतेने या शेतक-याला ग्रासले होते. अखेर विष पिऊन त्यांनी आपले जिवन संपविले. या शेतक-याचे मागे पत्नी, चार मुले व मोठा आप्तपरिवार आहे.