विविध शेतकी योजनांचा माहिती चित्ररथ येतोय आपल्या गावी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांचे आवाहन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विविध शेतकी योजनांचा माहिती चित्ररथ येतोय आपल्या गावी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांचे आवाहन

Share This
 खबरकट्टा / चंद्रपूर : 
जिल्हा माहिती कार्यालय व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय चंद्रपूर मार्फत योजना शेतकऱ्यांच्या दारी या अभियानाची अभियानाची सुरुवात 26 नोव्हेंबरला करण्यात आली आहे.


             

या अभियानाच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनामार्फत शेतीच्या संदर्भात विविध योजना थेट शेतकऱ्यांच्या दारी पोहोचता यावे व या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी चित्ररथ  चंद्रपूर जिल्ह्यातील तालुक्यामधील गावांमध्ये जाऊन जनजागृती करीत आहे. 
या चित्ररथाच्या माध्यमातून शेतीच्या विकासाच्या संदर्भातील विविध योजनेचा लाभ घेता यावा यासाठी प्रसिद्धी होत आहे तसेच शेतकऱ्यांना शेती संदर्भातील योजनांची नोंदणी तालुका कृषी अधिकारी कार्यालय व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय येथे करावी यासाठी मार्गदर्शनात्मक ठरत आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांचे आवाहन केले आहे. 



असा  असणार चित्ररथाचा  मार्ग:
🔶आज दिनांक 1 डिसेंबर रोजी राजुरा तालुक्यातील राजुरा आठवडी बाजार येथे चित्ररथ येणार आहे. 
🔶चंद्रपुर तालुक्यातील देवाडा, शिवणीचोर, हिंगनाळा,मार्डा या गावांमध्ये तर भद्रावती तालुक्यातील पानवडाळा, नंदोरी.
🔶बल्लारपूर तालुक्यातील कोर्टीमक्ता, कोर्टीतुकुम. 
🔶मूल तालुक्यातील जानाळा कांतापेठ ,टोलेवाही चिरोली (बाजार). 
🔶सावली तालुक्यामधील केरोडा, पेटगाव, घोडेवाही.
🔶नागभीड मधील कोदेपार, वासाळा मेंढा, वासाळामक्ता,किटाळी मेंढा,मिंडाळा.
🔶चिमूर तालुक्यातील ब्राह्मणगाव, तळोधी,मासळ.
🔶जिवती तालुक्यातील पाटण.
🔶कोरपना तालुक्यातील तामसी,कुर्ला, तांबडी. 
🔶ब्रह्मपुरी तालुक्यांमधील तोरगांव, देऊळगाव कोलारी, पोंभूर्णा तालुक्यातील डोंगरहळदी.
🔶वरोरा मधील वरोरा, सिंदेवाही तालुक्यातील लोनवाही (आठवडी बाजार), कारघाटा.
🔶गोंडपिंपरी तालुक्यांमधील गोंडपिंपरी, विठ्ठलवाडा.
या तालुक्यातील गावांमध्ये चित्ररथ येणार असून या माध्यमातून शेतीच्या विकासासंदर्भातील अनेक योजनांची माहिती मिळणार आहे. या शेतीच्या विकासासंदर्भातील अनेक योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ .कुणाल खेमनार यांनी केले आहे.