खबरकट्टा / चंद्रपूर :राजुरा
बि एल ए (bla) मिट्टीखदान सास्ती येथे स्थानिक प्रकल्पग्रस्त तथा बेरोजगार युवकांना मिट्टीखदानीत रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी काँग्रेसचे संपर्क प्रमुख नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष अशोक राव, राजुरा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष संतोष शेंडे यांच्या नेतृत्वाखाली कामबंद आणि चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
या प्रसंगी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी २/१/२०२० पर्यंत स्थानिक बेरोजगारांना प्राधान्य देण्यासाठी क्षेत्राचे आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेऊन स्थानिक होतकरू लोकांना सामावून घ्यावे. अन्यथा स्थानिक युवक, बेरोजगार येथे कंपनीचे काम चालू देणार नाहीत असा इशारा देण्यात आला. स्थानिक नागरिकांनी आज जवळपास पाच तास काम बंद पाडले होते.
या प्रसंगी राजुराचे ठाणेदार एम. एम. कासार, कंपनी चे प्रमुख पद्धधिकारी, युवक काँग्रेसचे निरंजन मंडल, तिरुपती गुपाला, श्रीधर पुल्लीपाका, रोशन लोहबळे, सागर भोयर, धनंजय गुपाला, रज्जत गोटे, समेश आसंपल्ली, किरण भुपेली, चरण भुपेली, विकेश नरड, चरण नलाला, अविनाश दासरी, गणेश कोंडेकर, नितेश शेंडे, बबलू कुशवाह यासह शेकडो स्थानिक कार्यकर्ते, बेरोजगार युवक उपस्थित होते.