मधूमक्षिका पालन शेतशिवारात अस्वलीचा १३ दिवसा नंतर पुन्हा मुक्काम, मधूमक्षिका पेट्यांचे नुकसान #bear - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मधूमक्षिका पालन शेतशिवारात अस्वलीचा १३ दिवसा नंतर पुन्हा मुक्काम, मधूमक्षिका पेट्यांचे नुकसान #bear

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :भद्रावती  - 

भद्रावती शहराच्या उत्तर दिशेला चंदनखेडा मार्गावर सुमारे ७ किमी अंतरावर असलेल्या मांगली (रै.) शिवारात शुक्रवार दि. २७ डिसेंबर ला ८.३० वा. रात्रीच्या सुमारास  अस्वलीने  १३ दिवसानंतर पुन्हा मुक्काम ठोकला आहे.


हिच अस्वल दि. १५ डिसेंबर रोजी या गावाच्या शेत शिवारात दिसून आली होती. दि. २७ डिसेंबर रोजी मांगली (रै.) गावाच्या पूर्वेला लोकवस्तीला लागूनच असलेल्या अजय पिंपळकर यांच्या शेतात अस्वलीने पुन्हा बस्तान मांडून शेतातील मधुमक्षिका पेट्यांचे पुन्हा नुकसान केले. यापूर्वी सुध्दा त्यांच्या मधुमाक्षिका पेट्यांचे नुकसान अस्वलीने केले होते.

मांगली (रै.) या गावातील शेतकरी अजय पिंपळकर गेल्या पाच वर्षापासून मधुमक्षिका पालन व्यवसाय करीत आहे. अस्वलीने त्यांच्या शेतातील आता पर्यंत दोन मधुमक्षिका पेटीचे नुकसान केले आहे. यामुळे त्यांचे सुमारे सोळा हजाराचे नुकसान झाले आहे. त्यांनी शुक्रवारला उर्वरीत सर्व मधुमाक्षिका पेट्या घरी आणल्या आहे. या शिवारात अस्वालीचा वावर वाढल्याने त्यांच्या मधुमक्षिकेच्या इतर पेट्यांना नुकसान होण्याची शक्यता बढावली आहे.